खेळणा प्रकल्पात 'जलपूजन' - JDM

JDM


Breaking

Tuesday, September 3, 2024

खेळणा प्रकल्पात 'जलपूजन'


खेळणा प्रकल्पात 'जलपूजन'

सिल्लोड प्रतिनिधी/ गणेश शिंदे

खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाला झाल्याने शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते खेळणा प्रकल्पात जलपूजन करण्यात आले.

यंदा तालुक्यातील अंभई महसूल मंडळात सुरुवातीपासून दमदार पाऊस झाल्याने केळगाव प्रकल्प १५ दिवसांपूर्वी' ओव्हरफ्लो' झाला आहे. यामुळे खेळणा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली होती. रविवारी रात्री पुन्हा या परिसरात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाला आहे. खेळणा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल.

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने मागील काळात खेळणातील बराचसा गाळ काढण्यात आला होता, खेळनातील जलसाठा वाढवा यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. खेळणा धरणाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरी स्तरावर असल्याचे यावेळी अब्दुल समीर म्हणाले.

खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यातील चिंचपूर, मांडणा, पालोद, मंगरुळ, दहेगाव, अन्वी, डोंगरगाव, तर भोकरदन तालुक्यातील आव्हाणा, सुभानपुर, मालखेडा येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला की पिण्याच्या पाणी आरक्षित करून वरील गावातील शेतकऱ्यांना कॅनॉल द्वारे खरिपासह रबी हंगामासाठी पाणी दिले जाते. यामुळे परिसरातील विहिरींनाही फायदा होत असल्याने यंदा रब्बी चे क्षेत्र वाढेल असा अंदाज अब्दुल समीर यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, शेख जावेद, माजी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नॅशनल सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, माजी नगरसेवक जितेंद्र आरके, राजू गौर, बबलू पठाण, रमेश पालोदकर आदींची उपस्थिती होती.



JD महाराष्ट्र NEWS 
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859