आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संचलित साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे डीएलएम किटचे वितरण - JDM

JDM


Breaking

Friday, September 15, 2023

आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संचलित साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे डीएलएम किटचे वितरण


शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन

आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित, साई सेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे शुक्रवार दिनांक 8/ 9 /2023 रोजी NATIONAL INSTITUTE FOR THE EMPOWERMENT OF PERSONS WITH INTELLECTUAL DISABILITIUTE(DIVYANGJAN) Manovikas Nagar. Secunderabad या संस्थेने (टी. एल. एम.) किटचे वितरण आयोजित केले. 
या शिबिरात 57 विद्यार्थ्यांना या किटचे विद्यालयात वितरण करण्यात आले. यावेळी NIEPID RCI Navi Mumbai चे Officer Incharge श्री. रविप्रकाश सिंग यांनी सर्व शिक्षक पालकांना शैक्षणिक साधनांचा उपयोग कसा करावा याबद्दल माहिती दिली. 

मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी तसेच जनरल नॉलेज साठी या किटचा उपयोग होईल तसेच दिव्यांगासाठी कोणत्या योजना आहेत याची सखोल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी राहाता तालुका केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे साहेब, साईबाबा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. पितांबरे मॅडम, दिशा अभियानचे समन्वयक माननीय श्री राठोड सर तसेच विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.    
    मा. सौ. डॉ. पितांबरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या काय असतात व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले.
    विद्यालयाच्या मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाचे विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख यांनी विद्यालयाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती घुले मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पडला.