उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार: शिवसेना ग्राहक कक्षाचा निर्धार मेळावा - JDM

JDM


Breaking

Friday, September 15, 2023

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार: शिवसेना ग्राहक कक्षाचा निर्धार मेळावा

 
दौरा दुष्काळाचा,चर्चा पायगुणाची! - मुकुंद सिनगर

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन


अहमदनगर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा नुकताच पदाधिकारी मेळावा श्रीरामपूर येथील शिव पार्वती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचं रान करू असा निर्धार शिवसेना ग्राहक कक्षाच्या जिल्हा बैठकीत एकमुखाने करण्यात आला. नुकतेच उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर,कोपरगाव,राहाता तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आले असता ते जिथे जिथे जात होते त्या त्या भागात पाऊस सुरु झाल्याने दौरा दुष्काळाचा जरी असला तरी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा पायगुणाची होत असल्याने आता शेतकरी, कष्टकरी यांच्या उत्कर्षांसाठी पुन्हा ठाकरे सरकार शिवाय पर्याय नसून आजपासून झटून कामाला लागण्याच्या सूचना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी आपल्या पदाधिकारी यांना दिल्या आहेत.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष राजू पाटील आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सक्षम कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातून सुरु करण्यात आले आहे. यावेळी शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जेष्ठ मार्गदर्शक, ग्राहक कक्षाचे जिल्हा संघटक अशोक थोरे तर प्रमुख उपस्थितीत राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर दुबय्या, शिवसेनेचे श्रीरामपूर तालुक्याचे नेते संजय छल्लारे, ग्राहक कक्षाचे जिल्हा कार्यालय चिटणीस ऍड. राहुल नवले आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरातील प्रमुख मार्गदर्शक वक्ते कृषिभूषण,ऊस अभ्यासक, व्याख्याते श्री.अनंत निकम, सहजिल्हा संघटक श्री. दत्ता कडूपाटील, सहजिल्हा संघटक श्री. प्रमोद कुलट आदींनी ग्राहक कक्षाच्या कामकाजबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुधीर जोशी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यात जिल्हा संघटक अशोक थोरे यांनी अधिक सांगितले की, जिल्ह्यातील प्रमुख विषयांना वाचा फोडण्यासाठी पदाधिकारी यांनी संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्यावे. ग्राहक हा आपल्या संघटनेचा केंद्रबिंदू असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्यात. यानंतर प्रमुख व्याख्याते श्री. अनंत निकम यांनी महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न आणि सरकारची उदासीनता यावर सखोल विवेचन करत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून अशीच शिबीरे घेतली जावीत आणि त्यातून खऱ्या अर्थाने समाजात जागरूक ग्राहक निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर सहजिल्हा संघटक श्री. दत्ता कडूपाटील यांनी पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन करत जिल्ह्यात 100 शाखा उघडून ग्राहकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. शिवसेना अडचणीत असताना आता आपल्यावर खरी जबाबदारी असून आपापसातील संघर्ष बाजूला ठेवून समाजातील प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा,असे आवाहन केले. यानंतर सहजिल्हा संघटक श्री. प्रमोद कुलट यांनी शेतकरी प्रश्नावर आक्रमक होत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यावर आणि कृषी विभागावर ताशेरे ओढले. यानंतर तालुक्यातील नेते संजय छल्लारे यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कामाचे भरभरून कौतुक करत समाजातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आता शिवसेनेचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध असल्याने यापुढे कुठल्याही ग्राहकांची फसवणूक होणार नसल्याने समाधान व्यक्त केले. उपजिल्हाप्रमुख शेखर दुबय्या यांनी ग्राहक कक्षास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपजिल्हा संघटक काळू हाटकर यांनी आपापल्या तालुक्यात प्रत्येक पदाधिकारी यांनी तात्काळ छोटी कार्यालये सुरु करून ग्राहक कक्षाच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्याचे आवाहन केले. 
यानंतर शेवटी अनेक उत्सुक नवीन पदाधिकारी यांच्या प्राथमिक मुलाखती घेण्यात आल्या असून पूर्ण यादी तयार करून शिवसेना भवन येथील मध्यवर्ती कार्यालयात जमा केली जाणार आहे. त्यातून योग्य आणि सक्षम पदाधिकारी निवडले जाणार असून दैनिक सामना मधून त्यांच्या अधिकृत निवड जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी दिली. यावेळी श्रीरामपूर तालुका संघटक श्रीकांत शेळके व शहर संघटक आबा बिरारी, नेवासा तालुका संघटक जयराम कदम व सोनई शहर संघटक संजय गडाख, राहुरी तालुका संघटक कृष्णा पोपळघट व शहर संघटक योगेश घाडगे, राहाता तालुका संघटक रिंकेश जाधव व शहर संघटक रवि सोनवणे, कोपरगाव तालुका संघटक अमोल शिंदे व शहर संघटक रविंद्र कथले, संगमनेर तालुका संघटक सदाशिव हासे व शहर संघटक योगेश बिचकर, अकोले तालुका संघटक लक्ष्मण शेळके व शहर संघटक विक्रम मालुंजकर आदी उपस्थित होते. शिबिराच्या व्यवस्थापनासाठी सह संघटक अमित कोलते, पंचायत समिती संघटक बाबा व्यवहारे, उपसंघटक संदीप सुरासे, संजय नायडू, आदिनाथ फाटके, विजय कुमावत, सतीश डोळस आदींनी मेहनत घेतली. यावेळी अनिल चव्हाण, शिवाजी मुसमाडे, शंकर आयनर, रोहित गवळी, राम इंगळे आदींसह ग्राहक कक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीरामपूर शहर संघटक आबा बिरारी यांनी तर जिल्हा कार्यालय चिटणीस ऍड. राहुल नवले यांनी आभार मानले.