राहाता तालुक्यातील गुरुजींनी अतिरिक्त केंद्रप्रमुख पदाचा कारभार नाकारला - JDM

JDM


Breaking

Monday, September 18, 2023

राहाता तालुक्यातील गुरुजींनी अतिरिक्त केंद्रप्रमुख पदाचा कारभार नाकारला

शिर्डी प्रतिनिधी:

राहाता तालुक्यात मंजूर बारा केंद्रप्रमुख पदांपैकी फक्त एक केंद्रप्रमुख पद रीतसर कार्यरत आहे बाकीचे 11 केंद्राचा केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार शाळेतील गुरुजींना सोपविण्यात आला होता.
परंतु शालेय वर्ग सांभाळून केंद्रप्रमुख पद पाहणे अतिशय जिकिरीचे झालेने तालुक्यातील प्रभारी केंद्रप्रमुखांनी आपल्या पदाचा नकार लेखी स्वरूपात माननीय गटविकास अधिकारी जालिंदर पठारे साहेब व गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे साहेब तसेच राहता तालुका समन्वय समितीला नकार दिला. 

जिल्हा परिषदेने काही शिक्षक मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांना स्वतःच्या अध्यापनाचे काम सांभाळून केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता, या पदाचा कार्यभार करतांनी विविध माहिती, ऑनलाईन ॲप, शिष्यवृत्ती ,विविध सर्वेक्षने, शासनाचे विविध उपक्रम, राबवताना या शिक्षकांची अतिशय दमछाक होत होती. तसेच राज्यप्राथमिक शिक्षक समन्वय समिती पासून तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती पर्यंत सर्व शिक्षक संघटनांनी शासनाच्या या चुकीच्या धोरणावर बहिष्कार टाकला होता व जे शिक्षक केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहतात त्यांना कार्यभार सोडण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानास प्रतिसाद देऊन आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, संगमनेर, नगर ,तालुक्यानंतर राहता तालुक्यातील प्रभारी केंद्रप्रमुख यांनी आम्ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन सदरचे अतिरिक्त काम सोडत आहोत अशा प्रकारचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, समन्वय समिती राहता तालुकाचे पदाधिकारी यांना दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक संघाचे नेते संजय नळे, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, सुनील गायकवाडसर तसेच अतिरिक्त कार्यभार सांभाळत असणारे आणि आज प्रत्यक्ष लेखी स्वरूपात नकार देणारे सर्व प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक उपस्थित होते.

 यावेळी शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री दत्ता गायकवाड यांनी या सर्व नकार दिलेल्या शिक्षक बंधूंचे मनापासून खूप खूप अभिनंदन केले आणि समन्वय समितीच्या आव्हानास प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मानले.