श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथामालेला सांगवीत प्रारंभ - JDM

JDM


Breaking

Friday, September 15, 2023

श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथामालेला सांगवीत प्रारंभ

पिंपरी-चिंचवड/प्रतिनिधी :
विजय भदाणे

मध्यप्रदेशातील कुदेश्वरधाम येथील पं.श्री प्रदीप मिश्रा यांच्या 'श्री अष्टविनायक शिवमहापुराण' कथेचे आयोजन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवारातर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर (दि.१५ ते २१ सप्टेंबर) आयोजित केले आहे. 
त्याचे औपचारिक उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. 
आमदार अश्विनी जगताप, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते. पं. मिश्रा यांचे शहरात प्रथमच आगमन झाले आहे.

 राज्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक आले आहेत. तीन मंडपांमध्ये भाविकांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. 
पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला. उद्‍वाहकातून मिश्रा यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आरती, शंखनाद व आतषबाजी करण्यात आली. 
हर हर महादेवचा गजर 'शत्रूंवर विजय मिळवायचा असेल, तर कसे लढायचे? असा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊंना विचारला. तेव्हा त्यांनी 'हर हर महादेव'चा मंत्र दिला. 'चारही बाजूने शत्रू आक्रमक असताना अहिल्यादेवी होळकर यांनी शिवलिंगाच्या आधारे त्यांना नामोहरम केले.'
         
          'अष्टविनायकातील पहिला गणपती मयूरेश्वराच्या मोरगाव परिसरात भगवान शंकर आणि माता पार्वतीचा वास होता, असा स्कंदपुराणात उल्लेख आहे,' असे दाखले देत मिश्रा यांनी कथेचा विस्तार केला. यावेळी भाविकांनी 'हर हर महादेव'चा गजर केला. 'मत कर बुरे करम बंदे वरना पछतायेगा।' या भजनावर भाविकांनी उभे राहून ताल धरला.

पं. प्रदीप मिश्रा म्हणाले...
- आईचे दूध पिलेले सनातन धर्म नष्ट करण्याचा विचार कधीच करणार नाहीत.
- दिखाव्यातून शिवतत्त्व प्राप्त होत नाही, त्यासाठी निर्मळ मन लागतं.
- चौकात थांबणारा नव्हे, तर गलेलठ्ठ पगार घेऊनही लाच मागणारा भिकारी असतो.
- हम तों बाबा के भरोसें चलते हैं। दुनियावाले जलतें हैं। 
- संत भगवंताची भक्ती करतात आणि जगाचे कल्याण होते.
- कोणाचे मन दुखवू नका, चांगले कर्म करा, त्याची चमक जन्मभर राहाते.
- बेलाची पाने आयुर्वेदिक आहेत, त्यांच्या सेवनाने थाईराइड, मधुमेह कमी होतो.

सांगवीतील रस्त्यांना यात्रेचे स्वरूप 
जुनी सांगवी: नवी व जुनी सांगवीला जोडणारे साई चौक, माहेश्वरी चौक, संविधान चौक, सांगवी फाटा या रस्त्यांना यात्रेचे स्वरूप आले आहे. साई चौक ते जुनी सांगवी पोलिस चौकी चौक रस्ता बंद ठेवून साई चौक ते फेमस चौक, सांगवी फाटा, पिंपळे गुरव अशी वाहतूक व्यवस्था केली आहे.


बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859
JD_महाराष्ट्र_NEWS