परभणी/पाथरी प्रतिनिधी:
प्रकाशराज लालझरे
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची अधिक आवड निर्माण होणे आवश्यक आहे, सध्याचे युग हे तंत्रज्ञान व माहितीचे युग असून, तंत्रज्ञानाचा वापर करता येत नसेल तरआपण निरक्षर आहोत याबरोबरच संशोधन प्रवृत्ती ही महत्त्वाची आहे, म्हणून शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन प्रवृत्ती निर्माण करावी असे आवाहन परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी केले.
दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे
पंचायत समिती, शिक्षण विभाग पाथरी व वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्योस्तव कार्यक्रमा च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पाथरीचे गट शिक्षण विस्तार अधिकारी मुकेशजी राठोड, मुख्याध्यापक यादव एन.ई. प्राचार्य डहाळे के एन, मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती गिराम ए आर आदी उपस्थित होते. दैनंदिन जीवनामध्ये आहाराचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी यांनी विज्ञान नाटिका सादर करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावले.
या नाट्य स्पर्धेचे परीक्षण श्रीमती जाधव पुजा व आनंत रासवे यांनी केले .
सूत्रसंचालन तुकाराम शेळके तर आभार प्रदर्शन प्रा. वाडकर डी. ए .यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील कर्मचारी वृंद यांनी कार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.