आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.. - JDM

JDM


Breaking

Friday, September 29, 2023

आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू..

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
विजय भदाने

पिंपरी चिंचवडसह पुण्यात गुरुवारी अनंत चतुर्दशीनिमित्त उत्साहाला उधाण आलं होतं. 
बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात आले. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक भव्य मिरवणुका काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. 

मात्र, पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे गणपती विसर्जन सुरू उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडयेथे एका चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
चिमुकल्याचा पाण्याची टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुखःद घटना घडली आहे. 
अर्णव आशिष पाटील असं या चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे.