मुख्यसंपादक:
किरण ताई जाधव
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळविहीर बुद्रुक, तालुका राहता येथे कैलासवासी माधव रघुनाथ थोरातयांचा 25 सप्टेंबर जन्मदिवस असल्याने त्यांचे चिरंजीव शिक्षक नेते श्री राजेंद्र थोरात सर आणि प्राथमिक शिक्षिका सौ. विद्या थोरात ऊर्फ गोरडे मॅडम या दांपत्याने आज 150 मुलांना मोफत वह्यांचे वाटप केले. सावळविहीर बुद्रुक शाळेतील सर्व मुलांना वह्यांचे वाटप करत असताना राजेंद्र थोरात म्हणाले की, आमचे वडील शिक्षणाविषयी अतिशय जागरूक होते. त्यामुळे आम्ही तीन भावांपैकी दोन भाऊ प्राथमिक शिक्षक आहोत आणि दोन प्राथमिक शिक्षिका आमच्या घरात आहे. शिक्षणाचे फायदे तोटे आमच्या दादांनी जाणलं होते, शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी त्यांना माहीत होत्या म्हणून आम्ही त्यांच्या जन्मदिनी, जरी ते आज हयात नसले तरी शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी राजेंद्र थोरात सर यांच्या निर्णयाचे आणि उपक्रमाचे खूप कौतुक केले.
शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री पंकज दर्शने सर यांनी मानले.
प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर जाधव सर मुख्याध्यापक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रूपाली मंद्रे ,सुचित्रा चवाळे, सविता सानप, संगीतायाईस्, सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859