आदर्श व्यक्तिमत्व युवा पत्रकार तुषारजी महाजन.. - JDM

JDM


Breaking

Thursday, September 21, 2023

आदर्श व्यक्तिमत्व युवा पत्रकार तुषारजी महाजन..

जिवेत शरद शतम् !

युवा पत्रकार तुषार संजय महाजन
यांचा आज जन्मदिवस JD महाराष्ट्र NEWS परिवारातर्फे  प्रथमतः मनस्वी शुभेच्छा. 

यानिमित्त युवा पत्रकार, युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, तुषार महाजन यांना आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त ग्रीन वर्ल्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 
आदर्श पत्रकार म्हणून ओळख असलेला सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रत्येक कार्यात हिरिरीने आपला सहभाग नोंदवितात. 

आपल्या अनोख्या उपक्रमाच्या शैलीने कायम चर्चेत राहणाऱ्या व विशेष प्रयत्नाने विविध उपक्रम मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्या आहे. 
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या, कोविड काळात प्रसादालय चालू करणे यासाठी निवेदन, अनाथालय येथे खाऊ वाटप व शालेय वस्तू वाटप, अनेक वेळा साईनाथ रक्तपेढी येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित त्यांनी केले. निस्वार्थ भावनेने काम करणारे आपल्यासारखे व्यक्तिमत्व या जगात खूप कमी आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील दोन वर्षापासून जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. 

युवा पत्रकार तुषार महाजन, आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कार्यरत आहे. सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने तुषार महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये काम केले, यासोबतच समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत. सध्या ग्रीन फाउंडेशन जिल्हाध्यक्ष, युवा वॉरियस शहराध्यक्ष, सोशल तरुणाई फाउंडेशन प्रसिद्धी प्रमुख, जीवन आधार फाउंडेशन (रेस्क्यू फोर्स) जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तालुका संयोजक, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि समाजाने आपल्या साठी काय केले यापेक्षा आपण समाज व देशासाठी काय करू शकतो हे महत्वाचे असून सर्वांनी संकटात खचून न जाता भेदभाव न करता एकमेकांस सुख दुःखात मदत करण्याची भावना असायला हवी असे नेहमी आम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करीत असतात, साईबाबांच्या आशिर्वाद नेहमीच मला प्रेरणा देतात व सेवेत आनंद मिळतो, अनेकांनी मला जीवनात आज येथेपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांचा मी शतशः आभारी आहे अशी भावना ते आवर्जून व्यक्त करतात, अशा या सामाजिक बांधिलकी असलेल्या या ध्येयवेड्या आणि कार्यमग्न तुषार महाजन साहेब या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना आणि सर्व सहकारी यांच्या वतीने सदिच्छा..! 

लेखक आणि शब्दांकन
विशाल रायते/पत्रकार