शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
शिर्डी येथील श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट शिर्डी चे आओ साई श्री खंडोबा मंदिराच्या वतीने श्री. साईबाबांचे परम भक्त श्री.म्हाळसापती चिमणाजी नागरे यांचा १०१ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
यावेळी सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी या पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत
श्री खंडोबा महाराज आणि श्री म्हाळसापती महाराज यांचे दर्शन घेत धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.सकाळी सात वाजता श्री म्हाळसापती समाधी येथे अभिषेक पूजा झाली त्यानंतर आठ वाजता आओ साई श्री खंडोबा मंदिर येथे श्री म्हाळसापती महाराजांच्या मूर्तीची व फोटोची श्री नागरे परिवार, श्री साईभक्त, मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली तर ९ वाजता सत्यनारायण पूजा, ११ वाजता गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच दुपारी १२ वाजता मध्यानं आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव पार पडला असून राज्यात असलेली दुष्काळी परिस्थिती पहाता अनावश्यक खर्चांना फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले व कोऱ्हाळे येथील साईराम कनिष्ठ महाविद्यालय वाचनालयात पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अपघात झालेल्या श्री निशांत रूघे कुटुंबीयांना उपचार कामी मदत देण्यात आली असुन श्री म्हाळसापती चिमणाजी नागरे परिवाराच्या वतीने उत्सवानिमित्त उपस्थिती मान्यवर व भाविकांचे श्री म्हाळसापती महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप नागरे , उपाध्यक्ष अजय नागरे , खजिनदार दिपक नागरे,अशोक नागरे , निलेश नागरे आदीसह नागरे परिवाराने आभार व्यक्त केले.
याप्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनराध्यक्ष निलेश कोते , कमलाकर कोते , गजानन शेर्वेकर , भाजप महिला आघाडी राहाता तालुका अध्यक्ष सुमनताई वाबळे आदीसह मान्यवरांचा ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला.
तर श्री साईबाबांचे परमभक्त श्री म्हाळसापती चिमणाजी नागरे यांचे आम्ही वंशज आहोत व त्यामुळेच आपल्या हातून हे सामाजिक,धार्मिक कार्य घडत असुन इतर खर्चाला फाटा देत १०१ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गरजवंताना शालेय साहित्य तसेच शिर्डीसह परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करुन आओ साई श्री खंडोबा मंदिर येथे धार्मिक कार्यक्रम घेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती श्री खंडोबा मंदिराचे चे अध्यक्ष संदीप नागरे यांनी दिली आहे.तर यावर्षीची परिस्थिती पाहता नागरे कुटुंबाने घेतलेल्या सामाजिक उपक्रमाने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला त्यामुळे असे स्तुत्य कार्यक्रम काळाची गरज असुन या सामाजिक उपक्रमाचे शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनराध्यक्ष निलेश कोते यांनी कौतुक केले.
दिवसभर चाललेल्या या पुण्यतिथी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसाद व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे उपाध्यक्ष अजय नागरे यांनी सांगितले... सर्व शिर्डी ग्रामस्थ व भाविक भक्तांचे आभार मानले.