मालेगाव प्रतिनिधी :
अमोल कल्याणकर
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील सुपुत्र आकाश काकाराव अडागळे वय 31 वर्ष हे देशाची सेवा करत असताना त्यांना 10 सप्टेंबर रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यामुळे संपूर्ण शिरपूर गावावर शोककळा पसरली आहे.
शिरपूर येथील कै. काकाराव आढागळे यांचे सुपुत्र आकाश काकाराव आढागळे वय 31 वर्ष गत 11 वर्षापासून भारताच्या इंडियन आर्मी मध्ये सेवा देत होते.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी ते काश्मीर लेह मध्ये आपल्या कर्तव्यावर असताना एका दुर्घटनेमध्ये ते जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी शहीद झाले.
देशाची सेवा करत असताना, आपले कर्तव्य बजावत असताना ते देशासाठी शहीद झालेआहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सौ रुपाली आकाश आढागळे ,व चार वर्षाची तनवी नावाची मुलगी आहे. आई विमलबाई आढागळे व दोन भाऊ नितीन आढागळे व उमेश अडागळे हे तिन्ही भावंड देशाच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत.
त्यांनी कठोर परिश्रम घेऊन शहीद आकाशने अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये इंडियन आर्मी मध्ये 2011 मध्ये प्रवेश मिळवला होता .
देशाची सेवा करत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.दिनांक आठ सप्टेंबर रोजी काश्मीर येथील लेह मध्ये त्यांचा अपघात झाला होता .दिनांक 10 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेमुळे संपूर्ण शिरपूर गावावर मात्र शोककळा पसरली आहे.