शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
अहमदनगर जिल्ह्यातील चर्मकार विकास संघाच्या वतीने चर्मकार समाजातील 10 व 12 वीच्या विद्यार्थी चा गुणगौवराव कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच जिल्ह्यामधील समाजकार्या मध्ये जे युवक युती महिला पुरुष असे अग्रेसर असणारे व्यक्ति यांचा सत्कार आमदार संग्राम (भैय्या )जगताप, मा. श्री. संदीप (दादा ) घनदाट व मा. श्री.संजयजी खामकर साहेब यांचा हस्ते, करण्यात आला यामध्ये शिर्डी येथील प्रसाद बाळु सुरंजे यांची निवड करण्यात आली.
सुरंजे हे नेहमी शिर्डी शहरामध्ये सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे, गरजवंतांना मदत सहकार्य करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे त्यांच्या कार्याचे दखल घेऊन चर्मकार विकास संघाने त्यांची निवड करून प्रसाद सुरंजे यांना (समाजरक्षक) समाज सेवक म्हनूण गुणगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिर्डी शहरातील मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.