कृषिमंत्र्यांनी अजित पवारांच्या सभेसाठी केलेला उठाठेव शेतकऱ्यांसाठी पण होईल का?- डॉ जितीन वंजारे - JDM

JDM


Breaking

Friday, August 25, 2023

कृषिमंत्र्यांनी अजित पवारांच्या सभेसाठी केलेला उठाठेव शेतकऱ्यांसाठी पण होईल का?- डॉ जितीन वंजारे

बीड प्रतिनिधी :

संबंध महाराष्ट्र कोरड्या दुष्काळाशी झुंज देत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयणीय झाली असताना महाराष्ट्रातील सत्ता कारण ढवळून निघत आहे.प्रत्येकच पुतण्या आपल्या चुलत्याला हुलकावणी देऊन स्वतंत्र चूल पेटवत आहे. या चुलत्या-पुतण्याच्या वादामुळे संबंध महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. पुतण्याच्या स्वतंत्र चूल पेटवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र विकासाची मात्र पूरती होळी झालेली आहे. महाराष्ट्रात बीड,लातूर,उस्मानाबाद धाराशिव, औरंगाबाद संभाजीनगर, परभणी इत्यादी जिल्ह्यांसह अनेक जिल्हे कोरडे आणि दुष्काळग्रस्त आहेत.
                   काही ठिकाणी दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांवरती आले होते त्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करूनही परत पावसाने दडी मारल्यामुळे आलेलं पीक जळून गेलेले आहेत शेताकडे अक्षरशा पाहू वाटत नाही, शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे.
यामुळे या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे ही सगळी परिस्थिती नेत्यांच्या डोळ्यासमोर असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत नसताना पोटामध्ये तात्पुरती पोट तिडकी निर्माण करणाऱ्या आणि आता सत्तेमध्ये आल्यानंतर आपापल्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी प्रचंड धडपड करणारे मंत्री-संत्री शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी इतकी उठाठेव करतील काय ? 

शेतकरी संकटात असताना बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ मदत करण्यासाठी आजित पवार, धनंजय मुंडे आणि सभेसाठी येणारे अनेक मंत्री महोदय सभा घेणार आहात का? 

का फक्त पक्षवाढ,शक्ती प्रदर्शन किंवा चुलत्यापेक्षा मोठी सभा घेऊन नुसताच मी मोठा असा कांगावा करणार आहात? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी विचारला आहे. 
बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या सभेसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब व येथील लोकल नेत्यांनी बीड शहर अगदी तेजोमय आणि रंगबिरंगी केलेले आहे.
           जागोजागी बॅनर होर्डिंग्ज लावलेले आहेत. महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त म्हणजेच राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज व महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हामुख्याधिकारी यांनी तात्काळ हटवन्यास लावले होते.कारण तेंव्हा वाहतूक कोंडी,कायदा,सुव्यवस्था आणि जनतेची सुरक्षा दिसत होती मात्र आता अजित पवार यांच्या सभेमुळे बीड जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी कोंडी होणारे बॅनर्स, मोठमोठे फलक आणि रोषणाईच्या नावाखाली जागोजागी रोवलेले खांब आता वाहतुकीला कोंडी निर्माण करत नाहीत का? म्हणजे शासन पण येथील राज्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि सामान्य माणसांना वेगळा न्याय अशा पद्धतीची दूटप्पीपणाची भूमिका बजावत आहे.कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी समान असून संविधानात दिलेल्या हक्क आणि अधिकार त्याचबरोबर कर्तव्यालाही अनन्यसाधारण महत्त्व असून आपण मोठे झालो म्हणजे आपण कायदा पाळायचा नाही, अशाच पद्धतीचे बीडचा बिहार करू पाहणाऱ्या नेत्यांवरती येथील मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी केव्हा कार्यवाही करतील हेच येत्या काळामध्ये बीडची जनता पाहणार आहे.

शेतकरी कष्टकरी कामगार मजूर पावसाअभावी हवालदिल असताना पक्ष वाढीसाठी चे कार्यक्रम घेतले जातात.यांना शेतकऱ्यांचं सोयरसुतक नाहीच.शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. स्वतःच्या शेतात राबणाऱ्या बापापेक्षा नेत्याची जास्त आणि मनोभावे खातीरदारी करणाऱ्या युवकांनी आता हे रोखले पाहिजे .आपल्या हितासाठी सभागृहात बोलणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे थांबलं पाहिजे आपली शेतकरी संस्कृती जपणारा नेता पाहिजे या कृषिप्रधान देशात स्वतःची पोळी भाजनाऱ्या नेत्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडणारा नेता आपण निवडला पाहिजे.

शेतीला प्राधान्य देऊन शेतीपूरक व्यवसाय अनुदान,शेती योजना ,सिंचन ,शिक्षण , महागाईवर नियंत्रण, बेरोजगारीवर नियंत्रण,हाताला कामधंदा,नोकरी ,आरक्षण अबाधित ठेऊन सामाजिक समतोल आणि सलोखा ठेवणाऱ्या दूरदृष्टीच्या नेत्याला सभागृहात पाठवले पाहिजे नाहीतर हल्ली सोबत असताना विठ्ठल आणि सोडला की शिव्या द्यायच्या,सर्रास गुंडांना निवडून दिले जात आहे तसेच स्वतःच्या स्वार्थापोटी केलेल्या राजकीय तडजोडी पहावयास मिळत आहेत.जनतेचा विचार न घेता हे सगळं होत आहे आणि यामुळे आपलं प्रचंड नुकसान होत आहे .आता यांना जाब विचारला पाहिजे आतापर्यंत बीड जिल्हा यांनी ऊसतोड कामगारांच्या आणि पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा ठेवलेला कामगाराचा जिल्हा हीच ओळख यांनी आपल्याला दिली आहे.
मोठे साहेब आले आणि गेले आता छोटे येणार आणि जाणार दोघंही तोंडापुरत बीड जिल्हा आमचा बालेकिल्ला आहे अस म्हणणार येथील चार दोन टकुच्याना खुश करणार आणि जाणार पण येथे एम आय डी सी नाही ,येथील शेतीसाठी मोठमोठे धरण नाहीत पाणी सिंचन व्यवस्था नाही ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत,शेतीला वीज नाही ,गावोगावी सभागृह, स्वच्छ्ता गृह,शिक्षण ,पक्के रस्ते ,नाली व्यवस्थापन नाही,वाचनालय नाही हे प्रश्न यांना कधी दिसणार.का फक्त बीड जिल्हा राष्ट्वादी चा बालेकिल्ला एव्हढच मनायच आणि आपला आपला म्हणून कायम अंधारात ठेवायच, विकासापासून कोसो दूर ठेवायचं हेच आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत
           येणाऱ्या सभेसाठी आलेल्या प्रत्येक नेत्याला जबाब विचारा आमची बेरोजगारी केंव्हा दूर होईल?
आम्हाला हाताला काम केंव्हा मिळेल?
शेतीला पाणी केंव्हा मिळेल?
ऊसतोड कामगार जिल्हा ही ओळख केंव्हा मोडेल?
रेल्वे केंव्हा येईल?
मोठमोठी धरण केंव्हा होतील?
बारामती सारखा बीड जिल्हा केंव्हा होईल? एमआयडीसी केंव्हा येईल?
हे आता येथील नेत्याला विचारलं पाहिजे.

आलेल्या सभेला प्रत्येक नेत्याला हे प्रश्न गाडी अडवून विचारा आणि नंतर व्हा त्यांचे बिनधास्त कार्यकर्ते आणि हा विकास झाल्यावर करा त्यांचा प्रचार लावा त्यांचे मोठमोठे बॅनर होर्डिंग्ज आणि सगळं काही.....!

बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना करा असे आवाहन यामार्फत सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले.