जिल्हा शल्यचीकीस्तक डॉ.सुरेश साबळे यांचं निलंबन रद्द करा - डॉ.जितीन वंजारे - JDM

JDM


Breaking

Thursday, August 3, 2023

जिल्हा शल्यचीकीस्तक डॉ.सुरेश साबळे यांचं निलंबन रद्द करा - डॉ.जितीन वंजारे



बीड प्रतिनिधी/-

कोरोना काळामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी करणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र वैद्यकीय क्षेत्राची आन बाण आणि शान,आपल्या कामाचा अवाढव्य अश्या पद्धतीचा अनुभव असणारे, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे, जिल्हा रुग्णालय बीड हे सुता सारखे सरळ करणारे सन्माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे साहेबांचं सभागृहातून झालेले निलंबन म्हणजे सुडापोटी झालेली कार्यवाही म्हणता येईल. 

कारण बाह्यश्रोतामार्फत एका खाजगी कंपनी तर्फे होणाऱ्या भरतीच्या घोटाळयाचा ठपका ठेवून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्यावर जी निलंबनाची कार्यवाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रश्नामुळे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सामंत यांनी घेतलेला हा निर्णय सरासर चुकीचा वाटत असून जनसामान्यांमध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीची उपचार मिळवून देण्यासाठी सतत कार्य तप्तर असलेले जिल्हा शल्यचीकीत्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या वरील झालेली कार्यवाही सूडापोटी झालेली असावी असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते तथा हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला.
बीड जिल्हा हा भ्रष्टाचारी जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यांमध्ये जेव्हा जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी आपल्या प्रामाणिकतेची पराकष्टा लावून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो त्यावेळी येथील भ्रष्टाचारी लोकं त्या अधिकाऱ्याला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतवून त्यांना येथून हाकलून लावले जाते अशाच प्रकारचा नियमबाह्य निलंबनाचा प्रकार बीड जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बाबतीत घडलेला असावा कारण बीड जिल्हा रुग्णालातील स्वच्छता, रुग्णांवरील होणारे उपचार,तेथील होणाऱ्या शस्त्रक्रिया, तेथील उपचार पद्धतीसाठी लागणारी यंत्रे या सर्वांबाबत अतिशय बारकाईने लक्ष देऊन सिविल हॉस्पिटल बीड हे सुतासारखे सरळ करणारे जिल्हा शल्यचिकिस्तक सन्माननीय डॉक्टर सुरेश साबळे हे सामान्य गरजुंचे,सामान्य शेतकरी, कष्टकरी, शोषित, पिडीतांचे जीवनदाते असून आपल्या कार्याची महती संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समाजाला सर्वश्रुत असणारे डॉक्टर सुरेश साबळे यांच्यावरती सूडापोटी झालेली निलंबनाची कार्यवाही ही सर्रास खोटी असून तात्काळ आरोग्यमंत्र्यांनी ती रद्द करावी आणि डॉक्टर सुरेश साबळे यांना बीड जिल्ह्याच्या जिल्हा शल्यकिस्तक पदी पुनर्नियुक्ती करावी अशी विनंती हीमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे. 
          
   बाह्य स्रोतामार्फत एका खाजगी कंपनी ला भरती प्रक्रिया बहाल केलेली असताना त्यात गैर प्रकार करण्याचा किंवा घोटाळा करण्याचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे यांचा हस्तक्षेप असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . भरतीत घोटाळा करण्याऱ्या कंपनी ला जबाबदार धरून तिच्यावर कार्यवाही न करता चोर सोडून सण्याशी ला फाशी दिल्यासारखा प्रकार डॉ सुरेश साबळे यांच्या संदर्भात झालेला दिसून येत आहे त्यामुळे त्यांची निलंबनाची कार्यवाही तत्कार मागे घ्यावी नसता आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा हीमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला.
                 भरतीचा घोटाळा समोर करून मुद्दामहून एका हूनहार अधिकाऱ्याला अश्या प्रकारे गुंतऊन संपवण्याचा जो कट रचला जातोय हे बीड जिल्ह्यातील सुजाण नागरिक खपऊन घेणार नाहीत.भरती घेणारी कंपनी म्हणजे बाह्य स्रोत असून तिचा आणि डॉ साबळे यांचा तिळमात्र संबंध नसून उगाच नाव बदनाम करून निलंबनाची सुडाची कार्यवाही ही खरोखर बीडच्या सामान्य जनतेच्या सेवकाला विनाकारण निलंबन करून त्यांची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्याचा हा कट असावा असा अंदाज आहे. जिल्हा रुग्णालय कोव्हीड काळात अतिशय कमालीने,अभ्यासपूर्ण हाताळल,लोकांना पाहिजे ती उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून लोकांची सेवा केली.काहीही काम असो 'एक फोन प्रॉब्लेम सॉल्व' अशी ओळख असणारे सन्माननीय डॉ सुरेश साबळे यांना खोट्या प्ररणात गुंतवून त्यांची प्रतिमा मलिन केली जाते आहे.त्यांना खोट्या प्रकरणात गुंतवून चांगला माणूस हाकलून द्यायचा आणि भ्रष्ट बोलवायचा हे गुठवर चालायचं, बीडला चांगला वर्दीची इज्जत राखणारा अधिकारी मुद्दामहून चालत नाही येथील भ्रष्ट यंत्रणा अधिकाऱ्यांना केसेस मध्ये गुंतवून भ्रष्ट अधिकाऱ्याची नियुक्ती करतात आणि मिलबाट के खातात, भ्रष्टाचार ही कीड बीड जिल्हा व महाराष्ट्राला लागलेला अभिशाप आहे तो काळा डाग काढायचं असेल तर असे कर्तव्यदक्ष अधिकारी बिडला रुजू झाले पाहिजे आणि येथील जनतेने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता ही निलंबनाची कारवाई सरासर खोटी वाटत असून चांगल्या अधिकाऱ्यांना मुद्दामहून त्रास देण्याचा षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे हे वेळीच थांबऊन डॉ सुरेश साबळे यांना पुन्हा नियुक्त करून त्यांना आपल्या सेवेसाठी रुजू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे यांनी केली.