प्रा.गुलाब श्रीपत साबळे मराठी विषयात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण - JDM

JDM


Breaking

Wednesday, August 2, 2023

प्रा.गुलाब श्रीपत साबळे मराठी विषयात यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण

सहसंपादक
अजय चोथमल 
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोभणी गावचे प्रा. गुलाब श्रीपत साबळे हे जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या यूजीसी नेट या परीक्षेमध्ये मराठी या विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. 
या अगोदर त्यांनी पाली या विषयातून सुद्धा नेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. या व्यतिरिक्त एम. ए. मराठी, पाली, संस्कृत, शिक्षणशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारामध्ये एम. फिल., शिक्षणशास्त्र आणि पाली विषयात एम. ए. एम. सी. जे. (वृत्तपत्र व जनसंवाद ) डी. एस. एम, . बी. पी. एड., बी. एड. आणि एम. एड. इत्यादी शिक्षण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण केले आहे.
   सध्या रिसोड येथील भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची पावती म्हणून विविध 21 पुरस्काराने सन्मानित केले गेले. 

त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लोकनेते माननीय भाऊसाहेब देशमुख आदरणीय सौ. जयश्रीताई देशमुख व .सचिव ॲडव्होकेट नकुल दादा देशमुख आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख यांनी कौतुक व अभिनंदन केले. शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी तसेच, या यशाबद्दल गोभणी ग्रामस्थांनी अभिनंदन केले. तसेच सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.