मुंबई वार्ताहर :
आतापर्यंत महामंडळाला १३ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी लाठीचार्ज झाला होता. त्या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ आगार पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बस पूर्णता जळाल्या, तर १९ बसची तोडफोड झाली आहे. यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले. तर तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाच्या आठ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.