व्यवस्थापकीय संपादक
मयूर साळवे
कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय,तसेच,जि प.प्राथमिक शाळेत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचाच्या वतीने लोकशाहीर डाॅ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच समाज सुधारक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतीथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी सरपंच जया माळी उपसरपंच आनंद राव भडांगे, ग्रामसेवक अमोल निकम,याची प्रमुख उपस्थिती होती तरी या प्रसंगी हरीभाऊ ढाणगे, नवनाथ आरणे, नारायण खंडीझोड, प्रवीण कोल्हे,यश खंडीझोड, अविज्ञा खंडीझोड, प्रकाश सरवार, आदींची भाषणे झाली.
जयंती साजरी करत असताना आपण इतर काही अनावश्यक खर्च न करता तो खर्च आपण समाजातील गरजूंना मदत केली पाहिजे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक मदत केली पाहिजे असे नवनाथ आरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तरी या प्रसंगी, लोक शाहीर अण्णा भाऊ साठे युवा मंचाचे सदस्य, चांगदेव आरणे, पंढरीनाथ आरणे, नवनाथ आरणे,संतोष आरणे, राजेंद्र सोळसे, नारायण आरणे, रोहीत आरणे, नवनाथ आरणे, अनिल आरणे, पांडुरंग आरणे, अर्जुन आरणे, विजय आरणे, सोमनाथ भारसकर,साजन आरणे, रोहीत आरणे, सुनिल आरणे, बबलू सोळसे, रूद्र आरणे, अनिकेत आरणे, बाबासाहेब आरणे,हरी आरणे, मच्छिंद्र आरणे ,तसेच सिकंदर इनामदार, सोमनाथ पाडेकर, दत्तू गोसावी, रविंद्र खंडीझोड, विनायक खंडीझोड,अजीज शेख, राजेंद्र कोल्हे, राजेंद्र कुराडे,शकिल सयदं, विठ्ठल कुरहाडे, शोएब इनामदार,तसेच शिक्षक शिक्षिका अशोक क्षिरसाठ, नलीनी साळवे, वैशाली मोरे, हरीभाऊ ढाणगे, संघमित्रा खंडीझोड,आदी उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर डाॅ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावातील प्राथमिक शाळेला लोकशाहीर डाॅ.आण्णाभाऊ साठे युवा मंच च्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.