आदर्श व्यक्तिमत्व अक्षयजी महाजन यांचा आज वाढदिवस - JDM

JDM


Breaking

Thursday, July 27, 2023

आदर्श व्यक्तिमत्व अक्षयजी महाजन यांचा आज वाढदिवस

जिवेत शरद शतम् |

श्री अक्षय संजय महाजन आदर्श व्यक्तिमत्त्व यांचा आज जन्मदिवस प्रथमतः मनस्वी शुभेच्छा..!
शांतप्रिय तसेच नेहमी हास्यविनोद करणारे व्यक्तीमहत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डीची संघटनात्मक ताकद उभी करून शिर्डीतील कॉलेज प्रश्नासाठी अविरत संघर्ष करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून शिर्डीत साई संस्थांनचे कॉलेज खेचून आणणारे विद्यार्थी नेतृत्व, एक समाजाभिमुख सुसंस्कृत व बाणेदार युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते, अक्षयजी महाजन यांना सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिर्डी शहर सहप्रमुख, त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख, राहता तालुकाप्रमुख पदी त्यांनी काम केले. 
अ.भा.वि.प संघटनेच्या माध्यमातून बससेवेसाठी आंदोलन, शिर्डी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने केली. शिक्षणमंत्री व पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले. व त्यांच्या कार्यास यश मिळाले. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, अनाथालय खाऊ वाटप, ४०१ फूट राष्ट्रध्वजाच्या यात्रा व युवा सांस्कृतिक महोत्सवचे असे अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या. अतिरिक्त शुल्क, मुलींसाठी बससेवा सुरू करणे, असे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम अक्षय भाऊ यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले.
सामाजिक बांधिलकी असलेल्या व विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना आणि सर्व सहकारी यांच्या वतीने सदिच्छा.


JD महाराष्ट्र NEWS - शिर्डी
लेखक आणि शब्दांकन
विशाल रायते, 
पत्रकार दै.सकाळ ✍🏻