शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
पढेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयातील इ.5 वी ते इ.12 वी पर्यंतचे 900 विद्यार्थी व 32 शिक्षकांनी योगासने केली.
प्राचार्य अरुण रोहोकले,पर्यवेक्षिका उज्वला शिणगारे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून योगा प्रशिक्षक सोमनाथ गायकवाड आणि सोमनाथ पटारे यांनी प्रार्थनेने योगासनाला सुरुवात केली, विद्यार्थ्यांकडून चांगल्याप्रकारे योगासनाची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यानंतर गुलाब पटेल यांनी योगासनाचे महत्त्व व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
शेवटी शांतीपाठ व मेडिटेशन (ध्यानधारणा) नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी क्रीडाप्रमुख महेश कोल्हे यांनी योगासन प्रशिक्षक,प्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.