सहसंपादक
अजय चोथमल
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि मालेगाव शाखेच्या वतीने धम्म प्रवचन मालिका घेतली जात आहे.
या धम्म प्रवचन मालिकेचे भव्य उदघाटन आनंद बुद्ध विहार वाशिम येथे दि. ३ जुलै २०२३ सोमवार रोजी ११ वाजता होणार आहे. भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, आद. महाउपासीका मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंत आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा वाशिम शाखेच्या वतीने वर्षावासा निमित्त प्रस्तुत युट्युब अनिल तायडे समाज सेवक ( निर्मित ) धम्म प्रवचन मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे.
या निमित्ताने धम्म प्रवचन मालिकेचे भव्य उदघाटन वाशिम होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक आद. सिध्दार्थ दा. भगत ( जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा वाशिम ), प्रमुख मार्गदर्शक आद. हरिश्चंद्र पोफळे ( संस्कार विभाग वाशिम ), कार्यक्रमाला उपस्थिती मा. गोविंदराव इंगळे ( जि. कोषाध्यक्ष ), मा. आश्विन खिल्लारे ( स. सै. द. प्रमुख वाशिम ), मा. देवानंद वाकुडे ( जिल्हा सरचिटणीस ), मा. दिलिप गवई, मा. अरविंद उचित, मा. हर्षल इंगोले ( कारंजा ), प्रभाकर सोमकुवर, मा. संध्याताई पंडित ( म. जिल्हा प्रमुख ), मा. आकाश इंगळे, व्याख्यानर्त्या आद. सविताताई खिल्लारे, आद. सागरताई इंगळे, आद. सविताताई डोंगरदिवे, आद. शिला गायकवाड या धम्म मालिकेला
सहकारी - आद. शालीकराम पठाडे ( ता. अध्यक्ष रिसोड ), आद. बळीराम पट्टेबहादुर ( केंद्रीय शिक्षक ), आद. मुकुंद वानखडे ( ता. अध्यक्ष वाशिम ), आद. प्रमोद बेलखंडे ( ता. अध्यक्ष म. पिर ), आद. सतिष भगत ( अध्यक्ष ता. मानोरा ), विलास गुडदे ( ता. उ मालेगाव ), राहुल वानखडे ( ता. सरचिटणीस मालेगाव ), विनोद ठोके ( कोषाध्यक्ष मालेगाव), ॲड, अमोल तायडे ( विधी सल्लागार ), विजय सोनुने ( बौद्धाचार्य ), माधव खडसे ( स. वि. प्र. मेडशी ), रजनीकांत वानखडे ( सं. वि. प्रमुख ), निखिल चक्र नारायण ( संघटक ), सुरज अवचार, बंडु खंडारे ( सैनिक ), संतोष तायडे ( सैनिक), अजय चोथमल (प्रसिद्ध प्रमुख भारतीय बौद्ध महासभा मालेगाव), धम्म प्रवचन मालिकेचे निर्माते आद.अनिल भिमराव तायडे ( भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष मालेगाव ), दिगदर्शक आद.मिलिंद मोतीराम खडसे हे आहेत.
तर वाशिम येथील आनंद बुद्ध विहार वाशिम येथे दि. ३ जुलै सोमवार रोजी धम्म प्रवचन मालिकेचे भव्य उदघाटन सोहळा संपन्न होत आहे. तरी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन आद. अनिल तायडे साहेब यांनी केले आहे.