शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
विद्या प्रसारिनी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल प्रशालेत छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम इयत्ता दहावी मधील इंग्रजी व मराठी माध्यमतील विद्यार्थीनी आयोजित केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख आणि शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर सर, श्रीमती. सुरेखा परदेशी तसेच समिती सदस्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वैभव सुर्यवंशी यांनी केले. किरण खारे, श्रुती सोनवणे, सिद्धांत कुमार, कार्तिक शिंगारे, अनुष्का मावकर, साहिल पाठक, प्रिया चव्हाण, हर्षल लालगुडे, आस्था या दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन चरित्र, सामाजिक कार्य, अशा विविध विषयांवर विवेचन केले.
विद्यार्थ्यांना प्रशालेतील इतिहास विषय शिक्षक, व मराठी विषय शिक्षक, यांनी मार्गदर्शन केले. तसेच गणित विषयाचे शिक्षक श्री.जयवंत सिसोदे सर यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या चरित्राबद्दल गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित एक सुंदर कविता लेखन व गीत दिग्दर्शन तसेच सादरीकरण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय काळे सर यांनी केले. कार्यक्रम सुनियोजित व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनिता ढिले मॅडम, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ सर, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर सर, पर्यवेक्षिका श्रीमती. क्षमा देशपांडे मॅडम, मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती.परदेशी यांनी मानले. ध्वनी संयोजन आणि स्टेज व्यवस्था सेवक श्री.गजानन कदम यांनी केले.