शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे. आषाढी एकादशी निमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल 7 हजार किलो साबुदाणा 5 हजार किलो शेंगदाणे 1 हजार किलो तूप वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. आज दिवसभरात जवळपास 80 हजार भाविक साईप्रसादाला येतील, अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा प्रसाद तयार करण्यात आला आहे. साईबाबांच्या समाधीवरसुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येत असतो.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीतील साई मंदिरामध्ये देखील विशेष सजावट केली जाते. यासोबतच विठ्ठलाची प्रतिमा ठेवून त्यांचंही पूजन येथे केलं जातं. फुलांच्या सुंदर सजावटीसह तुळशी माळांनी साईंची मुर्ती ही सजवली जात असते. यंदाची आकर्षक सजावत करण्यात आली आहे. कारण भक्त हे आपल्या साईबाबांमध्ये विठ्ठलाला शोधत असतात. यामुळेच शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत हजारो साई भक्त आजच्या दिवशी दर्शनासाठी रांगा लावतात.
सकाळपासून हजारो भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेत साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला आहे.