शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
सत्कार करतांना शिर्डी शहरातील गुन्ह्गारी प्रवृत्तीच्या लोकांवर तसेच भाविकांची फसवनुक करणा-यांवर पोलीसांनी कड़क कारवाई करण्याची मागणी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना केली आहे .
कार्यक्षम पोलीस अधिकारी असा नावलैकिक असलेले आणी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारे संदीप मिटके यांची नुकतीच शिर्डीचे डीवायएसपी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब कोते सचिन तांबे,गोपीनाथ गोंदकर ,मनसेचे दत्ता कोते ,आप्पासाहेब कोते ,निलेश कोते ,गफ्फारभाई पठाण.विनायक कोते,हाजी बिलाल शेख ,राजेंद्र शिंदे ,अजित पारख , ,गणेश गोंदकर ,विकास कोते ,अरविंद कोते राजेंद्र कोते, गणी पठाण, दत्तू कोते ,हौसीराम कोते ,दत्तात्रय गोंदकर अजय नागरे, बाळासाहेब कोते,नाना काटकर, अभिजीत कोते,सलीम शेख खंडू गोर्डे, सचिन गायकवाड, नितीन धिवर,समिर शेख, जावेद शेख गिरधर सोनेजी, संजय बनकर, संतोष देवकर सत्कार केला.
साईबाबांच्या मुळे शिर्डीची किर्ती जगभर पोहचल्याने साईंच्या दर्शनासाठी लाखों भाविक शिर्डीत येतात . भाविकांच्या सुरक्षीततेची जबाबदारी पोलीसांची आहे . पॉलिशवाल्यांकडून फसवणुक करणा-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे . शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना त्रास देणा-या रोड रोमीयोंचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच पाकीटमारी करणा-या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणी शिर्डीतील अवैध व्यवसायीकांवर धड़क कारवाई करण्याबरोबरच वाहातूक शाखेकडून परराज्यातील भाविकांकडून वाहन तपासनीच्या नावाखील होणारी लुट थांबावी आदी मागण्या शिर्डी ग्रामस्थांनी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे केली आहे .