संत सेवालाल महाराज यांच्या भावकीतील आचार्य (Phd) पदवी मिळवणारा पहिला महाराज- डॉक्टर जगदीश ताराचंद राठोड! - JDM

JDM


Breaking

Saturday, June 24, 2023

संत सेवालाल महाराज यांच्या भावकीतील आचार्य (Phd) पदवी मिळवणारा पहिला महाराज- डॉक्टर जगदीश ताराचंद राठोड!

जिवती प्रतिनिधी
कृष्णा चव्हाण

इतिहासामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या भावकीतील दोन प्राध्यापकांना एकाच वेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी देऊन सन्मानित केले आहे. ही गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी आहे. प्रा. डॉक्टर जगदीश राठोड हे संत सेवालाल महाराज यांचे बंधू हापा यांच्या वंशातील असून ते पुसद येथे अध्यापनाचे कार्य करतात. केवळ ते प्राध्यापक नसून ते फार कमालीचे समाजसेवक आहेत. महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्थेच्या माध्यमातून वधु वर परिचय मेळावा असो की, विवाह मेळावा. भजन स्पर्धा असो की,एखाद्या सामाजिक कार्यक्रम या सर्व कार्यक्रमाचे आयोजनाचे ते प्रमुख संयोजक असायचे. पोहरागड येथे येणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी व साहित्यिक, लेखक ,कवी मंडळींची देखभाल करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे प्रा. डॉक्टर जगदीश राठोड होय. यवतमाळ जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आचार्य पदवी मिळवलेली आहे. 
आज पोहरागडातील महाराजांच्या कुटुंबामध्ये आचार्य पदवी मिळवणारा पहिला महाराज म्हणजे प्रा. डॉक्टर जगदीश राठोड होय!* डॉ. जगदीश राठोड हे संयमी, मनमिळाऊ आणि प्रेमळ आणि स्पष्ट बोलणारे असल्यामुळे त्यांची सर्वदूर ख्याती आहे. गोरबंजारा समाजाच्या कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत त्यांचे चांगलेच संबंध असून बंजारा समाजातील राजकीय पुढारी असो की, नेता प्राध्यापक असो की डॉक्टर ,साहित्यीक असो की लेखक या सर्वांना पोहरादेवी मध्ये हवा हवा असा वाटणारा प्रा. डॉक्टर जगदीश राठोड म्हणजे दिल दोस्ती आणि दुनियादारीतला मस्त कलंदर आहे. 

महाराज कुळातील असून त्यांनी केव्हाही आपल्या अंगामध्ये महाराजकी आणली नाही. मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक लोकांना ते आदराने बोलतात. पोहरागड येथे गेले की मान सन्मान देतात. अजून पर्यंत त्यांच्या अंगी अहंकार आलेला नसून ते अत्यंत संयमाने वागतात. त्यामुळे त्यांच्यासोबत एकदा जुडलेला माणूस तो कधीही डिलीट होत नाही. 
पोहरागडातील दैनंदिन घडणाऱ्या गती विधींचा त्यांना दांडगा अभ्यास असल्यानंतरही ते पोहरागडाच्या हिताच्या बाजुने सदैव बोलत राहतात. पोहरागडातील कोणताही कार्यक्रम असो त्यांच्यामध्ये ते हिरारीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी त्यांची धडपड सुरू राहते. पोहरागडामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली पण त्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन सदैव पोहरागडाचा मान उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून प्रा. डॉक्टर जगदीश ताराचंद राठोड यांची ओळख गोरबंजारा समाज मनावर आजही दिसून येते. 

पोहरागडाचा विकास झाला पाहिजे या एकमेव उद्देशाने ते हरदम, हर घडी चिंतन करत असून पोहरागडात जे अन्नछत्रालय सुरू आहे. या संकल्पनेमध्ये साधक परिवार म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
मंहत कबिरदास महाराज, जानुसिंग महाराज, प्रकाश महाराज, विलास महाराज व इतर टिम यांच्या सोबतीने ते पोहरागडाच्या विकासाचे नियोजन करत आहे. त्यांच्यावर काही प्रमाणात पोहरागडाच्या मंदिराची जबाबदारी, घराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदारी,राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या बाल कामगारांचा सखोल अभ्यास करून आचार्य पदवी प्राप्त करावी. यासाठी ते खरोखर अभिनंदनास पात्र आहे.