जळगाव जिल्हा प्रतिनिधी
योगेश पाटील
रावेर तालुक्यातील कांडवेल येथील लोकांची मूलभूत सुविधांसाठी धावपळ नेमकी हीच बाब आ.चंदूभाऊंनी काही दिवसांपूर्वी लक्षात घेत आज पुनर्वसन टप्पा ३ संदर्भात कांडवेल येथे ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी ह्यांची बैठक घेतली.
गेली अनेक वर्षे पुनर्वसन होऊनही मूलभूत सुविधांचा अभाव, रस्ते जैसे थे, पाणीपुरवठा जैसे थे, गटारी, सांडपाण्याचा निचरा, विद्युत पुरवठा ह्या समस्या कायम अशी परिस्थिती ह्या सर्व गोष्टी लक्षात घेत भाऊंनी आज सविस्तर बैठक घेतली.
ह्या सर्व समस्यांचा लवकर निपटारा होऊन ही काम तातडीने मार्गी लागली पाहिजे असे अधिकाऱ्यांना आदेशीत केले.
तसेच अधिकाधिक नवीन कामे मंजूर करून ते ही लवकरात लवकर पूर्ण करणार असे ग्रामस्थांना आश्वासित केले.
माझ्या काम करण्याच्या पद्धतीला शोभेस आणि उत्कृष्ट दर्जाचे काम व्हायलाच आहे असे देखील बजावले. यापुढे कसलीही दिरंगाई झाली तर मी मुळीच खपवून घेणार नाही असे देखील स्पष्ट केले.
उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी आ.चंदू ह्यांच्याशी चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर बैठकीला तहसीलदार बंडू कापसे, पुनर्वसन विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कुलकर्णी मॅडम, विभागीय अभियंता बागुल साहेब, विद्युत बोर्डाचे योगेश महाजन साहेब, सरपंच सौ.जयश्री योगेश पाटील, उपसरपंच विनोद कोळी, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कोळी, जीवन पाटील, ज्येष्ठ नागरिक सुरेश तुकाराम पाटील, तेजराव काळू पाटील, आंनदा पाटील, देविदास देवराम पाटीलअशोक शिवराम पाटील ,बाळू नारायण पाटील, अंजनाबाई दामू कोळी, संजय कडू पाटील आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.