भारत राष्ट्र समिती कोरपणा तालुका गडचांदूर शहर बैठक संपन्न - JDM

JDM


Breaking

Saturday, June 24, 2023

भारत राष्ट्र समिती कोरपणा तालुका गडचांदूर शहर बैठक संपन्न

के.सी.आर.चे नेतृत्वाला भक्कम प्रतिसाद: आनंदराव अंगलवार

जिवती प्रतिनिधी
कृष्णा चव्हाण
गडचांदूर : भारत राष्ट्र समिती चे प्रचार यात्रा विधान सभाक्षेत्र जि चंद्रपुर चे समन्वयक आनंदराव वाय अंगलवार यांचे नियोजनात व आशिष नामवाड यांचे नियोजनात गडचांदूर शहर शाखा बैठक स्थानिक शासकीय विश्रामगृहात आनंदराव वाय अंगलवार यांचे अध्यक्षतेत मा.युनुस अकबानी नेते बि.आर एस.उधदव कांबळे, योगेश मरशिवने हे सर्व आसिफाबाद जिल्ह्याचे नेते तसेच आशिष नामवाड , कृष्णा चव्हाण, गोपाल ईराळे अरविंद चव्हाण, ताराचंद राठोड, भागवत मोरे, शंकर पगडपल्लीवार, विठ्ठल कुसळे व अन्य पदाधिकारी याचे प्रमुख उपस्थितीत गडचांदूर शहर बैठक संपन्न झाले व शहरातील विविध पक्षातील कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती या पक्षात माननिय के.सी.आर साहेब तेलंगाणाचे मुखयमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारत राष्ट्र समिती यांचे नेतृतवात व सर्व समाजाचे सर्वांगीण विकास साधणारे योजना प्रति विशवास ठेऊन अनेक कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश घेतले.

या प्रसंगी कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्री आशिष नामवाड केले तर प्रमुख मार्गदर्शक व कार्यकमााचे अधयक्ष आनंदराव वाय अंगलवार वयुनूस अकबानी, उधदव कांबळे यांनी मान.केसी.आर यांचे भारतीय शेतकरी व समस्त मागासवर्गीय तसेच अल्प संख्याक समाजा करिता आखलेले व कार्यान्वीत योजना व मान.के.सि.आर यांचे आगामी काळातील राष्ट्रीय दुरदृष्टी बाबत सविस्तर माहीती आपले भाषणातून दिले व कोरपणा तालूका व गडचांदूर परिसरातील बहुसंख्य महिला व पुरूष कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती या संघटणेत प्रवेश घेण्यास प्रेरित केले. या प्रसंगी अजय सकिनाला, मिनाक्षी मुन व रेशमा चव्हाण सह बहुसंख्य समूहाने कार्यकर्ते उपसथित होते. या प्रसंगी गडचांदूर शहर महिला व पुरूष कार्यकारीणीचे गटीत करण्यात आले.