सहसंपादक
अजय चोथमल
वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरात भरपूर प्रमाणात शासकीय खुल्या जागेवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्याच प्रमाणे वाशिम नाक्यावर स्टेट बँकेच्या बाजुला एकता नगर जवळ राधाकृष्ण हाॅस्पिटलच्या समोर खुल्या शासकीय जागेवर काही लोकांनी नियोजन बद्ध पद्धतीने कट रचून तारेचे कुंपण करुन करोडो रुपयांची जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.
तरी, प्रशासकीय यंत्रणा मात्र मुग गिळुन गप होती. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रंगनाथ धांडे यांच्या हा कट निदर्शनास आल्यावर त्यांच्या नेतृत्वात दि. १०/०२/२०२२ व नंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी परत दि. २१/०९/२०२२रोजी माननीय तहसीलदार साहेब रिसोड यांच्या कडे ह्या जागेवरील अतिक्रमण काढुन ही जागा शासनाने ताब्यात घ्यावी असे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन, तहसीलदार साहेबांनी मुख्याधिकारी नप रिसोड यांना कारवाई साठी सुचना दिल्या.
प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होऊन माननीय जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ठाणेदार व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी ती अतिक्रमित जागा रिसोड पोलिस स्टेशने ताब्यात घेऊन . त्या ठिकाणी वाहतूक शाखेची चौकी निर्माण केली. हे अतिशय चांगले झाले. जनतेतुन ही जागा पोलिस स्टेशननने ताब्यात घेतल्याने ,हे तात्काळ झाल्याने. सर्वत्र कौतुक होत आहे.
या साठी वंचित बहुजन आघाडी ने निवेदन दिल्यानेच शासनाने दखल घेतली हे मात्र खरे. या निवेदनावर. प्रा. रंगनाथ धांडे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, उत्तर झगडे जिल्हा सचिव, गजानन बाजड,प्रदिप खंडारे, मा.शहर अध्यक्ष, ॲड. किशोर तुरुकमाने, अर्जुन डोंगरदिवे, प्रा. अंलकार खैरे, ॲड. डि. टी. मोरे, महेश तिडके, विजय सिरसाट, केशवराव साभादिंडे, शेख अकिलभाई, राहुल जुमडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.