शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
जेष्ठ कवयित्री प्रा. निर्मला शेवाळे ऊर्फ आनंदिता लिखित "करंजमाळ" हा ललित संग्रह अष्टगंध प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे.
ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी,लेखक,समीक्षक डॉ.चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ कवी श्रीयुत अन्वर मिर्झा, सुप्रसिद्ध कवयित्री वृषाली विनायक, तसेच जेष्ठ लेखिका बालसाहित्यिका शोभा नाखरे व प्रकाशक संजय शिंदे ह्यांच्या विशेष उपस्थितीत रविवार दिनांक ९ जुलै, २०२३ रोजी, दुर्वांकुर हॉल, ५ वा मजला, चेतना महाविद्यालय जवळ, आंबेडकर गार्डन समोर, शास्त्री नगर, बांद्रा (पूर्व) मुंबई-५१ येथे सकाळी १०:३० ते दुपारी २:०० या वेळेत संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी जेष्ठ कवयित्री शिल्पा परुळेकर सांभाळणार आहेत.
प्रा. निर्मला शेवाळे यांचे "प्रेमगंध, आशावादी कवडसे आणि पुसट रेषेच्या आत बाहेर" हे तीन काव्य संग्रह तर "अस्मिता" हा बालकथा संग्रह हे साहित्य यापूर्वी प्रकाशित झाले असून आता "करंजमाळ" हा पहिला ललित लेख संग्रह प्रकाशित होत आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे लेखिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.