साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी - JDM

JDM


Breaking

Friday, June 30, 2023

साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी


शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन)

आज साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढण्यात आली. त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांची वेशभूषा करण्यात आली.
      याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम व मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी वारी विषयी माहिती सांगितली.
       वेशभूषा करण्यासाठी विद्यालयातील कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर, विशेष शिक्षक श्री ओम प्रकाश खताळ सर, विशेष शिक्षक श्री नासिर देशमुख सर, विशेष शिक्षक श्री बालाजी हनमंते सर, विशेष शिक्षिका श्रीमती नंदा शेळके मॅडम, विशेष शिक्षिका श्रीमती स्वाती शेळके मॅडम तसेच श्री सचिन भोर, श्री संकेत जगधने, श्रीमती मेघा हासे, श्रीमती मथुरा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.