सीटू च्या आशा व गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेवर विराट धरणे आंदोलन - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 12, 2022

सीटू च्या आशा व गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेवर विराट धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेस चार तास घेराव 

लोहा प्रतिनिधी 
किरण दाढेल
नांदेड : जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या घेऊन सीटूच्या झेंड्याखाली जिल्हा परिषदेवर विराट धरणे आंदोलन दि. ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
आंदोलनामध्ये हजारो आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. 
राज्यव्यापी आंदोलनाची हाक राज्य फेडरेशनने दिली होती. 
राज्यभरातील जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तक  धडकल्या. 
विराट धरणे आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत यात्रेचे स्वरूप आले होते.
 जुलै 2020 ची मानधन वाढ रुपये 2000 व 3000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील सन 2021 ची वाढ रुपये पंधराशे व 1700 अध्याप पर्यंत थकित असल्याने आशा आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या. 
प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष देण्यात यावा. 
आशा व गटप्रवर्तकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात. 
अशा व गटप्रवर्तकांना दरवर्षी नियुक्तीपत्र देण्याची प्रथा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारस पत्र घेण्याचे बंद करावे.आशा व गटप्रवर्तकांना स्टेशनरी खर्च देण्यात यावा. आदी मागण्यांसह इतरही मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना देण्यात आले. 
निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी व आयुक्त मनपा नांदेड यांना देखील देण्यात आल्या आहेत. सीटूच्या वतीने दुसरे निवेदन दिले असून  नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधीनगर या शाळेच्या विरोधात सीटू चे 28 जुलै 2022 पासून जिल्हा परिषदेसमोर अखंड धरणे आंदोलन सुरू आहे. 
परंतु बोगस शिक्षण संस्थेला पाठीशी घालण्याचे काम गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. नांदेड हे करीत असल्याचा गंभीर आरोप आज सीटूच्या वतीने लेखी निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित शाळेवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा निर्धारही सीटूच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोजी केला असून मागण्याची पूर्तता झाली नाही तर पुढील आंदोलन थेटमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षामध्येच करण्यात येईल असा इशारा देखील या वेळी देण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. विजय गाभणे अध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार,सचिव कॉ.गंगाधर गायकवाड आदींनी केले आहे. अ.भा. किसान सभेचे राज्य सहसचिव कॉ.अर्जुन आडे यांनी पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शीला ठाकूर, वर्षा सांगडे, सारजा कदम, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मुकेश आंबटवार, कॉ.गंगाधर खुणे आदींनी परिश्रम घेतले. सीटूच्या झेंड्याखाली झालेल्या आंदोलनामध्ये अशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्याचे दिसून आले असून जिल्हा परिषदेस चार तास घेराव घालण्यात आला होता.
 स्थानिक मागण्यांची पूर्तता तातडीने झाली नाही तर पुढील आंदोलन थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षामध्येच राहील असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.