जंगलामध्ये गुरे चरायला घेऊन गेलेला विलास नप्ते बेपत्ता - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 12, 2022

जंगलामध्ये गुरे चरायला घेऊन गेलेला विलास नप्ते बेपत्ता


प्रतिनिधी
अजय चोथमल / वाशिम
मालेगाव तालुक्यातील दिनांक 11 ऑक्टोबर मंगळवार रोजी मौजे भौरद येथील नेहमी प्रमाणे श्री विलास शंकरराव नप्ते वय 50 वर्षे (दत्तक ) भौरद यांनी 10 वाजता आपले गुरे जनावरे जंगलामध्ये चरायले चुलीच्या वावराच्या वरुन मोहाच्या माळामध्ये नेले होते. 
मंगळवारी दुपारी 1 वाजता भौरद येथे पाऊस व विजेचा कडकडाट सह ढगफुटी झाली. या मध्ये विलास नप्ते यांचे 3 वाजता गुरे घरी आले,परंतु गुरा मागिल श्री विलास नप्ते घरी आले नाही. 
संध्याकाळ झाली तर पण विलास नप्ते घरी न आल्याने गावातील सर्व मंडळी जंगलामध्ये रात्री 11वाजेपर्यँत त्यांना पाहत होते. ते अंधार आसल्यामुळे पहायला अवगड जात होते. दुसरा दिवशी बुधवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी पुर्ण जंगल, गावकरी पाहत आहे. तरी त्यांचा काहिच पत्ता लागला नाही. 
तरी पंचक्रोशित सर्व गावकरी मुँगळा, रेगांव मेडशी, कोळगांव, खेर्डी, अंधारसांगवी, कोळगांव, तरोडी, डोंगरकीन्हि, या सर्व गावांनी विलास नप्ते कोणास आढळून आल्यास ताबडतोप या खालिल नंबर वर संपर्क करावा. 
श्री संदिप नप्ते मो. 
7744969658