मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय - JDM

JDM


Breaking

Friday, October 14, 2022

मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय


शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
मुळव्याधीचा त्रास हा वेदनादायी आणि लाजिरवाणं असल्याने त्याबद्दल खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. खाण्यापिण्याच्या हानीकारक सवयीमुळे त्रास अचानक जाणवतो आणि अल्पावधीतच त्रासदायक होऊन जातो.

तिखट मसालेदार जेवण हे मुळव्याध व फिशर होण्याची कारणं आहेत. शोच्याच्या वेळेस तीव्र वेदना होण्यासोबतच रक्त पडण्याची समस्या वेळीच उपचार न केल्यास अधिक गंभीर होऊ शकते. यामुळे प्रसंगी गुदद्वाराचे कॅन्सर असलेले रुग्णही काही काळ मुळव्याध आहे म्हणून उपचार घेत असतात. त्यामुळे मुळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा त्रास सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास या घरगुती उपयांनी त्याचा त्रास कमी करा.
मुळव्याधीची लक्षणे रक्त पडणे, पोट साफ न होणे, कॉब बाहर येणे, शौचाच्या जागी दुखणे, आग किंवा खाज येणे, रक्त कमी होणे, शौचाच्या जागेतून पु किंवा स्राव येणे, संडासच्या जामी जखम होणे, सूज येणे.
उपाय- 
१) टॉयलेटमध्ये टाईमपास करू नका, विनाकारण टॉयलेट मध्ये जाऊन पेपर वाचणे, मोबाईलवर टाईमपास करणे व शौचास वाट पाहणे टाळा. जेव्हा खरंच ती इच्छा होईल तेव्हा टॉयलेटमध्ये जा. व कमोड टॉयलेटचा वापर करा.
(२) Sit Bath: मुळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे, राहाता यांच्या सल्ल्यानुसार वेदनादायी मुळव्याधीच्या त्रासावर हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. Sitz Bath या प्रकारामध्ये गुदद्वारा जवळील भाग एका टबामध्ये, गरम पाणी व पोटेंशिअम परमंटच्या मिश्रणाने स्वच्छ केले जाते. त्याने वेदना व सूज कमी होऊन मुळव्याधीचा त्रास कमी होतो. ही क्रिया दिवसातून एकदा किंवा ३ वेळा करू शकतात. 
३) पाणी भरपूर पिणे, बद्धकोष्टता व मुळव्याधीच्या रुग्णांनी तासाला एक ग्लास पाणी असे पिल्यास मुळव्याधी व constipation यांचा त्रास हा कमी होतो,
४) फायबरयुक्त पदार्थ अधिक खावेत. • मुळव्याधीचा त्रास कमी होण्यासाठी फळे हिरव्या पालेभाज्या भेंडी, पपई, अंजीर, भाकरी, गाजर, काकडी, टोमॅटो यांचा आहारामध्ये समावेश करण गरजेचे आहे. त्यामुळे बध्दकोष्ठता (constipation) कमी होते. शौचास साफ होते व परिणामी मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
५) फायवर supplements ची मदत घ्या. तुमच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचा समावेश नसल्यास याचा समावेश करावा, उदा. oats, Isarpgoal powder, सलाड, रायता याचा समावेश करावा. 
६) flavanond युक्त पदार्थ खावेत. चेरी, संत्रा, मोसंबी, ब्लॅकबेरी, ब्युबेरीज, पपई यासारखी फळे खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात, तसेच एका सर्वेक्षणानुसार यांच्या सेवनाने ५० टक्के लोकामध्ये मुळव्याधीची लक्षणे कमी झाली. रक्त, खाज व सूज कमी करण्यास मदत होते.
७) xylocaine jelly किंवा खोबरेल तेल लावावे, मुळव्याधीचा त्रास कमी असलेल्यांनी Xylocaine २१% किंवा खोबरेल तेल किंवा पेट्रोलियम जेली लावल्याने जागा मऊ होऊन त्रास कमी होती.
८) पाचक खाद्याचा नेहमी वापर करा. उदा, केळी, पपई, अंजीर, बेदाने, सुकामेवा हे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
९) गरोदरपणात व आजारपणात काळजी घ्यावी. गरोदरपणात व आजारपणात पेशंट हा भरपूर गोळांचे सेवन करतो, पाणी कमी पितो, आहारातही बदल होतो. औषधे उष्ण पडून मूळव्याध व फिशरचा त्रास होतो.
त्यासाठी गरोदरपणात व आजारपणात भरपूर पाणी पिणे तिखट मसाला कमी घेणे, चालण्याचा व्यायाम करणे, दही ताक घेणे व पोट साफ होण्याची औषधे उदा. Lactillow powder किया hquad paraffin lig Loctulose ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने व गरजेनुसार घ्यावीत.
----------------------------------------------------------------
साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता
संपर्क:
📲 9405000454
📲 9226 118118
डॉ.किरण गोरे
M.S  M.B.B.S


डॉ.सौ. अश्विनी गोरे
M.B.B.S
रेडिओलॉजिस्ट