निंभोरा सिम येथे लंपि आजारामुळे बैलाचा मृत्यू - JDM

JDM


Breaking

Friday, October 14, 2022

निंभोरा सिम येथे लंपि आजारामुळे बैलाचा मृत्यू

शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण

जळगाव प्रतिनिधी
योगेश पाटील
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये निंभोरा सिम गावात लंपि आजाराचा शिरकाव मोठ्याप्रमाणावर होतांना दिसून येत आहे त्यामुळे  शेतकरी त्रस्त झालेले आहेत अशाच निंभोरासिम गावातील प्रवीण भागवत सवरणे यांच्या मालकीचे बैल दिनांक  14 रोजी लंपि आजारामुळे मयत झालेला आहे.
त्यांनी भरपूर औषधोपचार करून सुद्धा बैलाला वाचू शकले नाहीत श्री वैद्यकीय अधिकारी  डॉक्टर अभिजीत गंगाराम डावरे यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली  तसेच बैलाचा पंचनामा केला. 
गावात लंपी आजाराचा शिरकाव झाल्याचे समजताच इतर शेतकरीही चिंता व्यक्त करीत आहे.