मुंबईतील विलेपार्ले स्थित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात इंडियन रेस्क्यू अकॅडमी तर्फे जीवरक्षक प्रशिक्षणाची सुरवात - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 5, 2022

मुंबईतील विलेपार्ले स्थित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात इंडियन रेस्क्यू अकॅडमी तर्फे जीवरक्षक प्रशिक्षणाची सुरवात

मुंबई प्रतिनिधी
नारायण सावंत
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार  ठाकरे  क्रीडा संकुलात  लाईफ  गार्ड  प्रशिक्षणाची नुकतीच  सुरवात  करण्यात आली आहे.  इंडियन  रेस्क्यू  अकॅडमी  व  प्रबोधनकार  ठाकरे क्रीडा संकुलाच्या  वतीने  या  उपक्रमाची सुरवात  करण्यात आली आहे.
सध्या  फक्त  मुंबईतच  जवळपास  २००  जलतरण  तलाव  तसेच  समुद्र  किनारे आहेत. अश्यावेळी तज्ञ जीवरक्षकांचा  कायमच  अभाव  जाणवतो व यामुळे  प्रचंड जीवितहानी होते.
नेमकी हीच गरज ओळखून प्रबोधनकार क्रीडा संकुलाने IRA च्या संयुक्त  उपक्रमाने ऑस्ट्रेलियन  मानकांचे जीवरक्षक  प्रशिक्षण  प्रथमच  मुंबईमध्ये IRA च्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. 
काल  पहिल्या  १५  जीवरक्षकांच्या  पहिल्या बॅच ने  प्रशिक्षण पूर्ण  करून सेवेत दाखल झाले. त्याप्रसंगी प्रबोधनकार  ठाकरे क्रीडा  संकुलाचे  अध्यक्ष  श्री.अरविंद  प्रभू  यांनी आपल्याकडे असलेल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या  अभावाकडे  लक्ष  वेधले.  शासकीय  स्तरावर  यावर  काम  चालूच  आहे. परंतु  या कोर्सच्या  माध्यमातून  आज  देशात  ३५०००  पेक्षा  जास्त  शासकीय  व  खाजगी  लोकांना  प्रशीक्षण  देण्यात  आले  आहे. आणि  आगामी  काळात  यातून  अनेक  सुशिक्षित  बेरोजगार  मुलांना  चांगल्या रोजगाराच्या  संधी प्राप्त  होतील. आणि  आपल्याला  मोठ्या  प्रमणावर  होणारी जिवतीहानी सुद्धा कमी  करण्यात  येईल. 
या  प्रसंगी IRA चे पदाधिकारी व ऑस्ट्रेलियन कॉन्सुलरचे अधिकारी उपस्थित होते.