जेऊर कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दीन साजरा - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 5, 2022

जेऊर कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दीन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी
अलोकनाथ पंडोरे
कोपरगांव तालुक्यातील जेऊर कुंभारी, संजयनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानात आर पी आय शाखेच्या वतीने व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने भीम अनुयायांच्या उपस्थितीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दीन साजरा करण्यात आला. प्रसंगी आर पी आय चे ज्येष्ठ नेते तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते  स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यातआले. त्यानंतर सामुहिक त्रिषरण, पंचशील व भिमस्तुतीचे पठण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना दिपकराव गायकवाड म्हणाले की,धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजेच अशोक विजयादशमी हा बौद्ध धर्मासाठी महत्त्वाच्या सणा पैकी एक सण आहे.
याच दिवशी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांना समतेची शिकवण देणाऱ्या विज्ञानवादी बौद्ध धम्माची दिक्षा दिली तेव्हापासून  धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, भास्करराव वाकोडे, मंगलताई आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड आदि मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी चांगदेव गायकवाड, संजय भालेराव, बाळासाहेब पगारे, राहुल गायकवाड, सोपान खरात, बाबूराव पवार, विठ्ठल चव्हाण, मनोहर गायकवाड, सचिन दिवे, नाना गवई, भीमराव वरशिळ, आनंदा चव्हाण, रतन साळवे, मंदाताई वकोडे,रेखाताई बनसोडे यांचेसह भिमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुमित पगारे, आकाश साळवे, पिलू गायकवाड, चांगदेव इस्ते, राहुल गायकवाड, आकाश पगारे,सुरेश चव्हाण, पप्पू गायकवाड, अवि पगारे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. प्रतीक्षा वाकोडे, दिपाली काकडे या युवतींनी स्मारक परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढून सजावट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.