इंदापूर/पुणे प्रतिनिधी
माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते गडचिरोली येथे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस शौर्य या पुरस्काराने बावडा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागनाथ पाटील यांना मिळाल्याबद्दल लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुक्याच्या वतीने व लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून लुमेवाडी (लिंबोडी)या गावी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बावडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी लहुजी शक्ती सेना इंदापूर चित्रपट आघाडी तालुकाप्रमुख विजय भाऊ साठे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आमच्या बावडा पोलीस चौकी हद्दीतील लोकांचे भाग्य मोठे व ही बाब गर्व वाटण्याजोगी आहे असेही ते म्हणाले यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुका संघटक लखन भाऊ वायदंडे भीमशक्ती अध्यक्ष सुनील चव्हाण व गावातील सुनील जगदाळे आप्पा भिसे योगेश वायदंडे बापू देवकर सागर जगदाळे ओम लावंड व समस्त लिंबोडी ग्रामस्थ उपस्थित होते