कोपरगाव प्रतिनिधी
अलोकनाथ पंडोरे
कोपरगांव
सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काढलेला रुमने मोर्चा असो अथवा पाण्यासाठी दिलेला लढा असो संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी ढगफुटी झाल्यावर ऐन वाढदिवसाच्या रात्री उशिरा संसार पाण्यात बुडालेल्या लोकांना धिर देण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठी स्वतः उपस्थित राहून केलेले मदतकार्य असो अथवा आमदार असताना सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेली कोट्यावधींची विकासकामे असो किंवा सर्वसामान्यांच्या जीवाचा प्रश्न म्हणून ताईसाहेबांनी भर पावसात नगर मनमाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेले आंदोलन असेल हे सर्व पाहता एकंदरीत संकटसमयी धावून येणे हाच खरा कोल्हे पॅटर्न असल्याचे मत जेऊर कुंभारी ग्रामपंचायत चे सदस्य प्रदिप गायकवाड यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, हाच पॅटर्न पुढे अत्यंत जबाबदारीने तालुक्याचे युवानेते श्री.विवेकभैय्या कोल्हे साहेब यांनी सुरू ठेवल्याचे दिसून येते. कुठल्याही प्रकारचा दिखावा अथवा राजकीय फायदा नजरेसमोर न ठेवता चिपळूण या ठिकाणी महापुरामध्ये अडकलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचे स्वयंसेवकांसह स्वतः उपस्थित राहून केलेले मदतकार्य सर्वांनाच ज्ञात आहे. कोविड काळात कोविड सेंटर उभारून विवेकभैय्या स्वतः त्या कोविड सेंटर मध्ये ठान मांडून बसुन रूग्णांना धीर देतांना संबंध तालुक्याने पाहिलेले आहे. ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालय बिल्डिंग येथे ग्रामीण भागातील प्रतिनिधींबरोबर ग्रामीण भागाच्या समस्या मांडण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात विवेकभैय्या स्वतः उपस्थित राहून ग्रामीण भागातील समस्या शासन दरबारी मांडून अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात केला जाणाऱ्या पाठपुराव्याचा आढावा घेतात त्यामुळे ग्रामीण भागातील समस्या मार्गी लागण्यास मोठे सहकार्य मिळाले आहे. कोल्हे परिवाराचे हे सर्व निस्वार्थी आणि समाजउपयोगी कार्य पाहता कोल्हे परिवार संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला आधार देणारा आधारवड असल्याचे सिद्ध झाले आहे असे मत प्रदिप गायकवाड यांनी व्यक्त केले.