सहसंपादक
अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे येथे नालंदा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा झाला थाटा संपन्न झाला.
मालेगाव येथून जवळ असलेल्या डोंगर किनी सर्कल मधील पांगरीकुटे येथे नालंदा अभ्यासिकेचे उद्घाटन पांगरी कुटे येथील मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश भाऊ कुटे यांच्या हस्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, डोंगरकिन्ही सर्कलचे पंचायत समिती सदस्य रवींद्र भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सारनाथ अवचार तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी आपल्या भाषणामधून सांगितले की वाशिम जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय वनिताताई देवरे समाज कल्याण सभापती यांच्या सहकार्यामधून वाशिम जिल्ह्यामध्ये 65 अभ्यासिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले. असून या अभ्यासिका चा उपयोग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्याकरता होणार असून विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे वंचित बहुजन आघाडी अशाप्रकारे वंचित घटकांना शिक्षण देण्याकरिता अभिनय प्रयोग राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी प्रदीप भाऊ कुटे माझी संचालक मध्यवर्ती सहकारी बँक व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र भाऊ देशमुख यांनी सुद्धा मार्गदर्शन केले माजी सरपंच गोपाल भाऊ कुटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रकाश पाटील कुटे माझी संचालक मध्यवर्ती सहकारी बँक तसेच पोलीस पाटील कुटे, सरपंचाचे प संजय भाऊ कुटे, माजी सरपंच गोपाल कुटे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संजय गायकवाड संजय गवांदे, केशव गायकवाड, ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य याशिवाय गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन वंचित चे केशव गायकवाड यांनी केले.