यास्मिन मिर्झा मलंग बेग यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 5, 2022

यास्मिन मिर्झा मलंग बेग यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न

नांदेड प्रतिनिधी
किरण दाढेल
नांदेड चौफाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल (अनु.)शाळेच्या अराजपत्रित मुख्याध्यापिका  यास्मिन मिर्झा मलंग बेग यांच्या सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा येथे दि.1 ऑक्टोबर रोजी कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
शाळेतील शिक्षक आणि महिला शिक्षिका, कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षिका यास्मिन मिर्जा मलंग बेग यांचा यथोचित सत्कार व गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना शिक्षक शाळेतून निवृत्त होतो पण सामाजिक, राजकीय , सहकार , क्षेत्रातून कधीच निवृत्त होत नाही. सेवानिवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा असे आपल्या प्रास्ताविकातुन शिक्षक पसरगे सर यांनी प्रतिपादन केले व सत्कार मूर्तीना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांनी सेवानिवृत्त नंतर काही गंगाजळी आपण राखून ठेवली पाहिजे,असा महत्वपूर्ण संदेश सेवापूर्ती समारंभास आलेल्या मान्यवरानी आपल्या मनोगतातून दिला.सेवापुर्ती सत्काराला उत्तर देताना  मिर्जा यास्मिन बेग यानी शाळेतील 32 वर्षातील अनेक कडू-गोडआठवणीना  उजाळा देऊन शाळेचे व शिक्षका सह मनावराचे आभार मानले.या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळयाचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कू ल चौफाळा शाळेतील कर्मचाऱ्यांनी केले होते.कार्यक्रमासाठी अराजपात्रित  मुख्याध्यापक घोडगे सर,शिक्षक परिषदेचे उन्हाळे सर,सेवानिवृत्त शिविअ मिस्किन सर,देगलूरचे शिक्षण विस्तार अधिकारी मणियार सर,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बसवदे सर,ल.सा.क.म.चे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे,उर्दू शिक्षक संघटनेचे गफार एम.ए.सर शेख एफ.एफ.सर जिल्हा परिषद हायस्कूल इतवारा पूर्ण स्टाफ,जिल्हा परिषद हायस्कूल देगलूर 'चे सर्व शिक्षक वर्ग, मिर्झा असलम बेग,जुबेर व सर्व मिर्जा यास्मिन बेग यांचा नातेवाईक परिवार शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डिंगणे सर यांनी केले.