नऊ नाण्याच्या 105 वा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न - JDM

JDM


Breaking

Wednesday, October 5, 2022

नऊ नाण्याच्या 105 वा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शिर्डी प्रतिनिधी 
संजय महाजन
शिर्डी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या वतीने श्री साईबाबांनी त्यांचा परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेते वेळी अंतिम क्षणी विजया दशमीला (दसरा) ला दान दिलेल्या नऊ नाण्याच्या १०५ वा अभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला अनेक साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला कै लक्ष्मीबाई शिंदे यांची नात श्रीमती शैलाजाताई शिंदे गायकवाड व पणतु अरुण गायकवाड ट्रस्टी यांच्या शुभहस्ते अभिषेक पूजा करण्यात आली ट्रस्ट बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा.