लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
लोहा तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समाजाला जाणाऱ्या नांदेड लातूर महामार्गावरील हिराबोरी तांडा ग्रामपंचायतीच्या संरपंच पदी थेट जनतेतून संरपंच म्हणून सौ गंगाबाई जाधव यांचा बहुमताने विजयी झाल्या तर,उपसरपंच पदी सोपान चव्हाण यांची बिनविरोध पणे निवड झाली आहे.
हिराबोरी तांडा ग्रामपंचायती सार्वत्रिक 2022 निवडणूक नुकतीच पार पडली यात सरपंच यंदा थेट जनतेतून असल्यामुळे सौ. गंगाबाई लोभाजी जाधव या सरपंच पदी निवडून आल्या सौ.जाधव ह्या आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राज्य सहसचिव प्रा सुरेश जाधव याच्या आई आहेत त्यांच्या पॅंनला जनतेने स्पष्ट बहुमत मिळाले.
त्यानंतर उपसरपंच पदासाठी काल दि.११-१०-२०२२ रोजी निवडणूक घेण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य सोपान चव्हाण यांचेच एकमेव नामांकन पत्र दाखल झाले असल्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा लोहा पं. स. चे विस्तार अधिकारी म्हेत्रे यांनी सोपान चव्हाण यांची हिराबोरी तांडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध पणे निवड जाहीर केली.
सोपान चव्हाण यांची हिराबोरी तांडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर होताच गावात त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला.
यावेळी उपसरपंच सोपान चव्हाण यांचा सरपंच सौ. गंगाबाई लोभाजी जाधव, ग्राम पंचायत सदस्य सदाशिव बालाजी चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या सौ. कविता देविदास चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या सौ. यमुना बालाजी चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या सौ. ताईबाई साहेबराव चव्हाण,युवा उद्योजक सुधिर नारायण जाधव , शिवाजी चव्हाण,बालाजी चव्हाण (चौकीदार),बन्सीलाल चव्हाण, उत्तम चव्हाण रावण जाधव देवीदास चव्हाण धनराज चव्हाण आदि गावकरी वतीने यांनी शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.