लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
लोहा (ता.प्र.) "इच्छा नसताना ना ईलाजाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्विकारला" आसे बौध्द अनुयायांच्या भावना दुखावनारे वक्तव्य केल्याची टीका करीत लोहा तहसिल कार्यालया समोर रिपब्लिकन सेनेने मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे,मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे,मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड,युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात तिव्र निषेध आंदोलन केले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंदरीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात लोहा तहसिल कार्यालया समोर आंदोलन झाले.आठवले यांच्या बेताल व बालिशपणे केलेल्या वकतव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी लोहा तहसिलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.नोंदणी नसताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अब्जावधी रुपये गोळा करते परंतु केंद्रसरकार दहशतवादी संघटनांवर कार्यवाही करताना भेदभाव करीत असल्याचा आरोप करण्यात आला.व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बेताल वक्तव्य करुन बौध्द अनुयायांच्या भावना दुखावल्या प्रकरणी रामदास आठवले यांची केंद्रीय राज्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी रिपब्लिकन सेनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे.यावेळी आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे,मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे,मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड,युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले,लोहा महीला आघाडी तालुकाध्यक्ष शांताबाई लांडगे,रोमण खिल्लारे,सचिनभाऊ आढाव,छगन हटकर,राहुल हंकारे,महेबुब शेख शिराढोणकर,जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप मगरे,आॅटो युनियन जिल्हाध्यक्ष विलास मगरे,एस.के.पवळे,उध्दव कांबळे ढाकणीकर,यांच्यासह शेकडो महीला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.