कोपरगाव प्रतिनिधी
सोमनाथ गव्हाणे
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिर १३ ऑगस्ट रोजी जेऊर कुंभारी, मारूती मंदिर परिसरात घेण्यात आले या शिबिरास जवळपास २०० नागरिकांनी मोफत तपासणी करून घेण्यात आली.
यावेळी सरपंच महासंघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जालिंदर चव्हाण ,उपसरपंच ताराचंद लकारे व सदस्य प्रदिप गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेऊर कुंभार येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते,
त्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच महासंघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जालिंदर चव्हाण, उपसरपंच ताराचंद लकारे ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड संचालक बाळासाहेब वक्ते, आप्पासाहेब वक्ते,
यशवंतराव आव्हाड, किरण पाटीलबा वक्ते, संदेश भोंगळे ,किशोर गायकवाड ,शिक्षक अनुज दुमणे,राणा वक्ते यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आत्मा मालिक हॉस्पिटलचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे व मॅनेजर सुनील पोकळे यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देताना सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणारे सर्व उपचार मोफत दिले जात असून अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे मणक्याचे आजार, हाडांचे आजार, लहान मुलांचे नवजात शिशू ( NICU) विभाग, अत्यावश्यक बाल रुग्ण सर्जरी, छातीचा कॅन्सर ,तोंडाचा कॅन्सर जठर व अन्न नलिकेचे कॅन्सर, पिताशय व तातडीचा कॅन्सर, मूत्रापिंड,यांसारखे इतर आजार योजने अंतर्गत मोफत होतात. व साखरेचे आजार, अर्धांगवायू, ब्लड प्रेशर , फुफुसांचे आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारखे आजार आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये अल्प दरात असल्याने अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे असे सांगितले.
जेऊर कुंभारी येथे आयोजित केलेल्या शिबिराचा ३०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला आहे तसेच शिबिरात तपासणी केलेल्या बऱ्याच रुग्णांना पुढील तपासणीसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांच्यावर महात्मा फुले योजनेतून शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
आत्मा मालिक हॉस्पिटल मधील डॉ. रेहमत दारूवाले,डॉ.महेबान सिंग,कापसे वैशाली,प्रितम शेळके,अभिषेक जाधव कृष्णा गवळी (MJPJAY), सय्यद नुरमोहम्मद, मोरे विघ्नेश्वर,राजू म्हस्के यांनी रुग्णांची तपासणी केली.
या प्रसंगी हॉस्पिटल कर्मचारी सय्यद नुरमोहम्मद यांनी जेऊर कुंभारी येथील शिबिरास नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आभार मानले.