तालुक्यातील ३३ शाळा बंद;गोर गरीबाच्या मुलांचे भवितव्य अंधारात : ?? - JDM

JDM


Breaking

Monday, October 3, 2022

तालुक्यातील ३३ शाळा बंद;गोर गरीबाच्या मुलांचे भवितव्य अंधारात : ??

▪️पट संख्याच्या कारणास्तव जि.प.शाळा बंदचा निर्णय गोर-गरीबांच्या मुळावर
▪️तालुक्यातील ३३ शाळा बंद;गोर गरीबाच्या मुलांचे भवितव्य अंधारात :
▪️शासण निर्णया विरोधात  रिपब्लिकन सेना तिव्र आदोलन करणार : सखाराम सोनवणे
लोहा : प्रतिनिधी
किरण दाढेल
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पट संख्याचा प्र.न निर्माण करून शासनाने ० ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे लोहा तालुक्यातील ३३ वाडी तांड्यावरील शाळा कायमच्या बंद होणार असून शासनाचा निर्णय वाडी, तांड्यावरील गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांच्या मुळावर असून यामुळे गोरगरिबांच्या मुला - मुलींचे शैक्षणीक भवितव्याचे नुकसान होणार असुन, शासणाने घेतलेला निर्णय हा वाडी तांड्यावरिल बालकांवतर अन्याय आहे. 
या शासणाच्या निर्णया विरोधात पालकातुन संताप व्यक्त होत आहे. शासण जि.प.शाळा बंद करुन खाजगी  इग्रजी शाळाना एक प्रकारे मद्तच केली जात आहे.असी पालकातुन चर्चा होत असुन तुम्ही किती ही खोके घ्या पाण गोर-गरीबांच्या मुला-बाळाना शिक्षणाच्या आधिकारा पासुन वंचित ठेवू नका? 
असे पालकातुन बोलले जात आहे. या शासण निर्णया विरोधात रिपब्लिकन सेना तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे तालुकाप्रमुख सखाराम सोणवणे यांनी दिला आहे.
मागिल सरकारच्या वतीने पहिली ते आठवी पर्यंत चे शिक्षण हे सक्तीचे आणी मोफत करण्याचा निर्णय घेतला होतो शासणाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले गेले त्यामुळे वाडी तांड्यावरिल गोर-गरीबाच्या मुलाबाळाना शिक्षण घेता आल परंतु या खोके "ईडी" सरकारणे पट संखेच्या नावावर तखलुक्याती ३३ शाळांवर गडातंर आनत तालुक्यातील वाडी-तांड्यावरील जि.प
शाळा ह्या कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे गरीबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिसकावून घेतला गेला. 
श्रीमंतांची मुले शिक्षण घेणार आणि गरीबांची मुले शिक्षणा पासुन वंचित रहाणार या शासणाच्यख चुकीच्या निर्णयामुळे लोहा तालुक्यातील रमना तांडा , देवणेवाडी , अहिल्याबाई नगर ,गोळेगाववाडी रम्याची वाडी , रम्याचा तांडा , करमाळा , काजलवाडी , बालू नाईक तांडा ,थावरा तांडा , उमला तांडा , होना तांडा , रुपला तांडा , हरीचंद्र तांडा , कामजलवाडी , नागदरवाडी , सिताराम तांडा , दलदरी तांडा , ठोगा तांडा , जामरून मुरबी , ठक नाईक तांडा , पोमा नाईक तांडा , गणा तांडा , करेवाडीसकरु तांडा , चित्रा तांडा , कोष्टवाडी , मोकलेवाडी , होटलवाडी तांडा , टाळकी तांडा , टाकरु तांडा , शिवाजी नगर तांडा , धानोरा या ३३ वाडी , तांड्यावरील जि . प . च्या शाळा पट संख्याच्या नावावर बंद होणार असुन, गोर गरीबाच्या मुलान शिक्षण घेता येवू नये म्हणुन की काय हा निर्णय घेतला या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गोर गरीबाच्या मुला साठी शिक्षण घेण्याची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे गोर गरीबांची मुले हे जि.प. शाळेतुनच शिक्षणाचे धडे गिरवीत भवितव्य घडवण्यासाठी धडपडत असतात परंतु या सरकारणे पट संख्या कमी असल्याचे कारण दाखवत या शाळाच बंद करुन खाजगी इग्रजी माध्यमाच्या शाळाना एक प्रकारे प्रोत्साहनच दिले आहे परंतु आधुनिक तत्रज्ञानाच्या काळात  गोरगरीबाना खाजगी इग्रजी माध्यम शाळेत शिक्षण देणे परवडणारे नसुन, संस्थापक हे मनमानी करुन भरमसाठ फिस आकारुन पालकाची लुट करत आहेत.असा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे शासणानी घेतलेला निर्णय मागे घेवून वाडी तांड्या वरील शाळा पर्वरत सुरु कराव्यात असी मागणी केली आहे.