कोपरगाव प्रतिनिधी
सोमनाथ गव्हाणे
आज शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला सोन्याचे दिवस आहेत.
युवकांनी दुग्धव्यवसायाबरोबरच दुग्धव्यवसायाला पूरक उपप्रदार्थ निर्मिती केली आणि व्यवसायात प्रामाणिकपणा ठेवला तर व्यवसायात नक्कीच भरभराट होईल असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केले.
देवकी संस्थेमार्फत सुधाकर होन सागर चव्हाण, शेखर चव्हाण यांनी सुरू केलेल्या दूध उत्पादकांना ' ना नफा ना तोटा ' या तत्वावर सरकी पेंड वितरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पेंड वितरण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर होन यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक अतुल दवंगे, शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, कैलास कोते, शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे संचालक सुधाकर रोहमारे उपस्थित होते.
याप्रसंगी भिमराज वक्ते, संचालक मधुकर वक्ते, संचालक संदिप चव्हाण, मिलन चव्हाण, आनंदराव चव्हाण, संचालक शंकरराव चव्हाण, जोगेश्वी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष भास्कर होन,माजी संचालक संजयराव होन, माजी सरपंच केशवराव होन,संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजी वक्ते,अनिल कदम, राहुल रोहमारे, विष्णुआबा शिंदे, माजी पंचायत समिती सभापती सौ.अनुसयाताई होन, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकरराव टेके, माजी संचालक हरीभाऊ शिंदे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी रक्ताटे, देर्डे कोऱ्हाळेचे सरपंच योगिराज देशमुख, उपसरपंच दिपकजी रोहोम, भगीरथ होन, शरद थोरात, रंगनाथ लोंढे, पोपटराव जाधव, बच्छाव, किरण होन, सरपंच युवराज देशमुख डॉ.अनिल दवंगे, भागीरथ होन, लक्ष्मण चव्हाण, प्रा.विठ्ठल होन, रोहिदास होन, सरपंच संजय गुरसळ, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, लक्ष्मण चव्हाण रामदास शिंदे, कल्याणराव गुरसळ, बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते, शंकरराव गुरसळ, तुषार गुरसळ, सहकारी चव्हाण, सोपानराव वक्ते, लक्ष्मण वक्ते, कोंडीराम वक्ते, रामभाऊ वक्ते, भानुदास वक्ते, सुनिल होन, नितीन होन, सागर होन यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधाकर होन व प्राध्यापक विठ्ठलराव होन यांनी केले. सूत्रसंचालन पिंगळे मॅडम यांनी तर आभार सुभेदार शांतीलाल होन यांनी मानले.