लोहा प्रतिनिधी
संगम पवार
शिक्षकाच्या न्याय हक्कासाठी कार्य करणाऱ्या व सदा अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी गजानन उपरवाड यांची निवड करण्यात आली.
लोहा येथील जि.प. हा येथे दि. ८-१०-२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची लोहा व कंधार तालुका शाखेची बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबुराव फसमले होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते जीवनराव वडजे , शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, मराठवाडा सरचिटणीस पी.डी.पोले, जिल्हाध्यक्ष बंडू पाटील भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग सोनटक्के , राजीव तिडके, आदी उपस्थित होते.
यावेळी गजानन उपरवाड यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी निवड करुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी लोहा व कंधार तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.