तीन दुचाकी चोरट्यांना
अटक;
१३ गाड्या जप्त
कोपरगाव : येथील पोलिसांनी शहरासह तालुका परिसरातील तीन दुचाकी चोरांना बुधवारी पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर साहेबराव
कापसे (वय २१), सचिन अंबादास कापसे (वय २०, दोन्ही रा. तागडी,ता. चांदवड, जिल्हा नाशिक ) व चेतन रमण कापसे (वय १९) असे त्यांची नावे आहे. त्यांच्याकडून आठ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबतीत अनके तक्रारी समोर येत होत्या.
त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्यांच्या शोधात होते.
त्यांच्या चोरीमुळे दुचाकींना घेऊन चांगलीच दहशत परिसरात पसरली होती.
परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलीस या चोरांच्या शोधात कसून तपास करत होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले कोपरगाव औद्योगिक वसाहत व शिंगणापूर या ठिकाणीचोरीची बुलेट विकण्यासाठी येत असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना कळाले. त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस हवालदार राजेंद्र पुंड, पोलीस शिपाई शिंदे, कुऱ्हाडे यांच्या मदतीने ही कारवाई केली.
कोपरगाव प्रतिनिधी
आलोकनाथ पंडोरे