शेवगांव प्रतिनिधी:
महीलांमुळे भारतीय संस्कृती व परंपरा टिकून आहेत.
सणोत्सवातील उपक्रम व सजावटीमुळे महीलांच्या स्रुर्जनशीलतेला व कल्पकतेला वाव मिळतो,असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
शेवगांव येथील स्वराज मंगल कार्यालयात दै.ताजी खबरे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आ.राजळे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
माजी नगराध्यक्ष विद्याताई लांडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या.तर शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, इनरव्हील क्लबच्या डॉ.मनिषा लड्डा,माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा किरण बिहाणी, पोलीस नाईक संगिता पालवे, मायाताई मुंढे, सुजाता फडके, मंजुश्री धुत ,स्नेहल फुंदे आदी प्रमुख उपस्थित होत्या.
आ.राजळे म्हणाल्या की,गौरी गणपती हे भारतीय संस्कृतीतील उत्साहाचे प्रतिक आहे.
घराघरातील या उत्सवाला सार्वजनिक स्वरूपात आणून कलात्मक सजावटीला अधिक वाव मिळण्यासाठी संपादक अलिम शेख यांनी दैनिक ताजी खबरेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उत्सवप्रिय शेवगांव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.
महिलांच्या कल्पकतेला व स्रुजनशिलतेला वाव मिळण्यासाठी अशा व्यासपिठाची आवश्यकता आहे. यावेळी स्पर्धेतील सौ. रंजना देशमुख, सौ वंदना पुरणाळे, सौ.तेजस्विनी देशमुख, सौ. सुजता फडके, कु. ऐश्वर्या भोकरे, उत्तेजनार्थ कु. गायत्री नांगरे, सौ. सोनल जोशी,सौ उषाताई लांडे, सौ.सपना काशीद,सौ.आशा बुलबुले, सौ मेघा जैन,सौ.सुवर्णा व्यवहारे या विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मर्जिना शेख, अमरीन शेख ,तहेसीन शेख, तरन्नुम शेख ,नाजरीन शेख, सकीना शेख,नजमा पठाण यांनी प्रयत्न केले.अलिम शेख यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचालन वैशाली जुन्नरकर यांनी तर आभार प्रदर्शन जवेरीया पठाण यांनी केले.