शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
कोरोना महामारी संकटानंतर सण उत्सव मोठ्या प्रमाणात व विना निर्बंध साजरे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रशासनास दिले आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कुठलेही उस्तव साजरे होत नव्हते. परंतू कोरोनावर मात करत हा आपला समाज निरोगी होत असल्याने येणाऱ्या सन दसरा व दिवाळी यां मोठ्या सनासाठी नागरिक विशेषतः महिला आपल्या घराची व परिसराची मोठ्या प्रमाणात स्वच्छता व रंगरंगोटी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना पाण्याची आवश्यकता असते. हिच बाब लक्षात घेऊन शिर्डी नगरीची माजी नगराध्यक्षा व शिवसेना शिंदे गटाच्या सौं अनिताताई जगताप पा. यांनी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे साहेब त्यांच्याकडे शिर्डी शहराला दैनंदिन पाणी पुरवठा करावा ही अशी मागणी केली.
मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे यांनी जगताप यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन उद्या पासून सण उस्तव काळात दैनंदिन पाणी पुरवठा करावा व उस्तव काळात महिलांना कुठलीही समस्या निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे सौं जगताप यांच्या सुचनेला प्रतिसाद देत अधिकाऱ्यांच्या नियुक्तीही केली.
यावेळी निवेदन देतांना सौं कस्तुरीताई मुदलियार, सौं अनिताताई सुर्वे, सौं. मीनाक्षीताई डुबल व अन्य महिला मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.