शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार जनशक्ति पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे व प्रहार जनशक्ति पक्ष कोपरगाव तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या आदेशाने व प्रहार विद्यार्थी सेनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश काळे पाटील यांनी कोपरगांव अंगारा एसटी महामंडळाचे सहाय्यक गायकवाड साहेब यांना प्रहार विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले पढेगाव येथील ५० विद्यार्थ्यांची बस नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जर सोमवार पर्यंत पढेगाव बस चालु झाली नाही तर मंगळवार दिनांक १८-१०-२०२२ रोजी प्रहार जनशक्ति पक्षाच्या व प्रहार विद्यार्थी सेनेच्या वतीने कोपरंगाव एस टी महामंडळ अंगारा येथे आमरण उपोषण करण्यात येईल असे प्रहार विद्यार्थी सेनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश काळे यांनी निवेदन देताना सांगितले आहे. यावेळी प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष आकाश काळे व विद्यार्थी उपस्थित होते.